"माझ्या आयुष्यातील प्रेम अन्...", शाहिद कपूरच्या वाढदिवसानिमित्त पत्नी मीराची रोमॅंटिक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 14:23 IST2025-02-25T13:22:46+5:302025-02-25T14:23:53+5:30
अभिनेता शाहिद कपूरच्या वाढदिवसानिमित्त पत्नीची रोमॅन्टिक पोस्ट.

"माझ्या आयुष्यातील प्रेम अन्...", शाहिद कपूरच्या वाढदिवसानिमित्त पत्नी मीराची रोमॅंटिक पोस्ट
Shahid Kapoor: अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) हा बॉलिवूडमधील हरहुन्नरी अभिनेता आहे. शाहिदने आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीतील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अलिकडेच अभिनेता 'देवा' चित्रपटामुळे चर्चेत आला होता. शाहिदने त्याच्या आजवरच्या काररकिर्दीत इंडस्ट्रीने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. अॅक्शन आणि रोमॅन्टिक सिनेमांच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्ताने पत्नीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान, बॉलीवूडमधील रोमँटिक कपल शाहिद कपूर आणि मीरा कपूर यांच्याकडे पाहिलं जातं. हे कपल अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. नुकतीच शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने पतीच्या वाढदिवशी सोशल मीडियावर रोमॅन्टिक पोस्ट शेअर करत त्याला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. ही पोस्ट शेअर करत मीराने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "माझ्या आयुष्यातील प्रेम आणि माझ्या जीवनातील प्रकाश... प्रत्येक गोष्टी सुरुवात आणि शेवट हा तुझ्यापासून आहे...,"अशी रोमॅन्टिक पोस्ट मीरा राजपूतने नवरोबासाठी लिहिली आहे. मीरा राजपूतच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया शाहिद कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मीरा आणि शाहिदला बॉलीवूडमधलं आदर्श कपल म्हणूनही ओळखलं जातं. वयाच्या २१ व्या वर्षी मीरानं शाहिद कपूरशी लग्न केलं. आता ते दोघेही आपल्या संसारात सुखी आहेत.