मिलिंद सोमणने पत्नी अंकितासाठी सगळ्यांसमोर केली ही गोष्ट, पाहून तुम्हीही म्हणाल अस्सा नवरा सुरेख बाई !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 18:00 IST2019-11-21T18:00:00+5:302019-11-21T18:00:00+5:30
तसेच फिटनेसबाबत नेहमी सतर्क असणारा मिलिंद सोमण बऱ्याचदा लोकांना फिटनेसचे टीप्स देत असतो. मिलिंदच्या प्रत्येक फोटोंना त्यांच्या चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळते.

मिलिंद सोमणने पत्नी अंकितासाठी सगळ्यांसमोर केली ही गोष्ट, पाहून तुम्हीही म्हणाल अस्सा नवरा सुरेख बाई !
५२ वर्षाचा मिलिंद २७ वर्षीय अंकिता. दोघांमध्ये २५ वर्षांचा फरक असूनही या कपलमध्ये कमालीची केमिस्ट्री पाहायला मिळते. आम्हा दोघांसाठीही वय म्हणजे केवळ एक आकडा आहे, असे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मिलिंदने म्हटले होते. अजब गजब असणा-या या कपलचे रोमांटीक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. तसेच फिटनेसबाबत नेहमी सतर्क असणारा मिलिंद सोमण बऱ्याचदा लोकांना फिटनेसचे टीप्स देत असतो. मिलिंदच्या प्रत्येक फोटोंना त्यांच्या चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळते.
नुकताच मिलिंदने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. गुवाहटीमधील एका कार्यक्रमात मिलिंद आणि अंकिताने हजेरी लावली होती. याच कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे. शेअर केलेल्या व्हिडीओत अंकितासह लोकनृत्य करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी स्टेजवर अंकिता आसामी 'बीहू' लोकनृत्य करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
यावेळी अंकितासह मिलिंदही थिरकत असल्याचे पाहायला मिळत आहे. अंकिता ज्याप्रमाणे स्टेप्स करते अगदी त्याप्रमाणे तो करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच या व्हिडीओ आधी अंकिताने आणखीन एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत मिलिंदच्या आईसह तिने हा फोटो क्लिक केला होता. तसेच शेअर केलेल्या फोटोलाही तिने समर्पक असे कॅप्शनही दिले आहे. ''जे तुम्हाला आवडतं. ज्या गोष्टी करण्यात तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद मिळतो त्या गोष्टी करत राहा'' अशी कॅप्शन तिने फोटोंना दिली आहे.