Mega Blockbuster trailer: ना सिनेमा, ना सीरिज! कपिल शर्मा व दीपिका पादुकोणचं ‘मेगा ब्लॉकबस्टर’ प्रकरण नेमकं आहे तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 15:41 IST2022-09-04T15:39:25+5:302022-09-04T15:41:12+5:30
What is Mega Blockbuster: कपिल शर्मा व दीपिका पादुकोण यांनी काही दिवसांपूर्वी ‘मेगा ब्लॉकबस्टर’ नावाच्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. ‘मेगा ब्लॉकबस्टर’ची जोरदार चर्चा होती...

Mega Blockbuster trailer: ना सिनेमा, ना सीरिज! कपिल शर्मा व दीपिका पादुकोणचं ‘मेगा ब्लॉकबस्टर’ प्रकरण नेमकं आहे तरी काय?
What is Mega Blockbuster: ज्याची प्रतीक्षा होती, ती अखेर संपली. होय, ‘मेगा ब्लॉकबस्टर’चा ट्रेलर रिलीज झाला. कपिल शर्मा व दीपिका पादुकोण यांनी काही दिवसांपूर्वी ‘मेगा ब्लॉकबस्टर’ नावाच्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. ‘मेगा ब्लॉकबस्टर’ची जोरदार चर्चा होती. सोशल मीडिया जोरदार हवा होती. अखेर हा ‘मेगा ब्लॉकबस्टर’ हा मल्टी स्टारर प्रोजेक्ट आहे तरी काय? याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. ही सीरिज आहे की सिनेमा? हे जाणून घेण्याची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. तर चला, त्याचाही खुलासा झाला आहे.
‘मेगा ब्लॉकबस्टर’ नावाचा ना चित्रपट आहे, ना सीरिज. मग ‘मेगा ब्लॉकबस्टर’ आहे तरी काय तर एक जाहिरात. होय, ‘मेगा ब्लॉकबस्टर’ हा एक ऑनलाइन शॉपिंग अॅड कॅम्पेन आहे.
गेल्या काही दिवसांपासून ‘मेगा ब्लॉकबस्टर’ची इतकी चर्चा होती की याचा ट्रेलर कधी एकदा येतो, असं चाहत्यांना झालं होतं. कॉमेडियन कपिल शर्मा, क्रिकेटर सौरव गांगुली, रोहित शर्मा, अभिनेता रणवीर सिंग, रश्मिका मंदाना आणि दीपिका पादुकोण असे सगळे स्टार यात आहेत म्हटल्यावर सगळे उत्सुक असणारच. हे सर्व स्टार एखाद्या सीरिजमध्ये वा सिनेमात एकत्र दिसणार, असं सगळ्यांना वाटलं होतं. पण झालं भलतंच. ही जाहिरात निघाली. या जाहिरातीचा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यात कपिल शर्मा, दीपिका, रणवीर, रोहित शर्मा व सौरभ गांगुली दिसत आहेत.
याआधी कोणत्याच जाहिरात इतके सेलिब्रिटी स्टार्स एकत्र दिसले नव्हते. आधी ही जाहिरात आहे, हे स्टार्स लपवू इच्छित होते. पण सौरभ गांगुलीने एक चूक केली आणि सगळीच पोलखोल झाली. सौरभने कंपनीकडून पाठवलेले पोस्टर शेअर केला. यात एक खास मॅसेज होता. पण तो फक्त सौरभसाठी होता. हे पोस्टर एडिट करून शेअर करायचं होतं. पण सौरवने ते एडिट न करताच शेअर केलं. ही चूक लक्षात आल्यावर त्याने ती पोस्ट डिलीट केली. पण तोपर्यंत ती पोस्ट व्हायरल झाली होती. ही जाहिरात आहे, हे तोपर्यंत सगळ्यांना कळलं. आज याचा ट्रेलर रिलीज झाला.