मसाबाने पतीसोबत केले Liplock, मागे उभे असलेले वडील व्हिव्हियन रिचर्ड्स हसले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 13:01 IST2023-01-29T12:45:36+5:302023-01-29T13:01:14+5:30
लग्नानंतर रिसेप्शन पार्टीत मसाबा आणि सत्यदीप यांनी एकमेकांना किस kiss केले. तेव्हा मागे उभे असलेले मसाबाचे वडील व्हिव्हियन रिचर्ड्स हसताना दिसले.

मसाबाने पतीसोबत केले Liplock, मागे उभे असलेले वडील व्हिव्हियन रिचर्ड्स हसले अन्...
बॉलिवुडच्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांची मुलगी मसाबा (Masaba) लग्नबंधनात अडकली. अभिनेता सत्यदीप मिश्रासह (Satyadeep Mishra) तिचा विवाह झाला. विशेष म्हणजे या लग्नात मसाबाचे वडील आणि वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्सही (Vivian Richards) होते. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. यानंतर ठेवलेल्या पार्टीत केक कट करताना या नवजोडप्याने एकमेकांना किस kiss केले. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नीना गुप्ता आणि त्यांचे व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्यासोबतचे अफेअर त्याकाळी चांगलेच गाजले होते. दोघांनी लग्न केले नाही मात्र त्यांनी मसाबाला जन्म दिला. तेव्हा नीना गुप्ता यांना समाजाच्या टोमण्यांना सामोरे जावे लागले. मात्र त्यांनी एकटीने मसाबाला वाढवले. आज मसाबा प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. मसाबाचे हे दुसरे लग्न आहे. लग्न झाल्यानंतर मसाबा आणि सत्यदीप यांनी एकमेकांना किस kiss केले. तेव्हा मागे उभे असलेले मसाबाचे वडील व्हिव्हियन रिचर्ड्स हसताना दिसले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
व्हिडिओवर सध्या नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. हीच का आपली भारतीय संस्कृती असं म्हणत नेटकऱ्यांनी टीका केली आहे. तर कोणी मसाबाचे हे दुसरे लग्न आहे असं म्हणलं आहे.
मसाबा आणि सत्यादीप यांच्या रिसेप्शन पार्टीत बॉलिवुडमधील काही कलाकारही सहभागी झाले होते. सोनम कपूर, दिया मिर्झा, कोंकणा सेन शर्मा हे पार्टीत दिसले.
नीना गुप्ता यांच्या पोस्टने वेधले लक्ष
लेक मसाबाच्या लग्नाचे फोटो शेअर करताना नीना गुप्ता यांनी लिहिलेले कॅप्शन फारच इंटरेस्टिंग होते. मुलगी, नवा मुलगा, मुलाची आई, मुलाची बहिण, मुलीचे वडील, मी आणि माझे पती, असे कॅप्शन त्यांनी फॅमिली फोटोला दिले.