रणवीर सिंगच्या चित्रपटात क्षिती जोगची वर्णी; 'रॉकी अँड रानी...'मध्ये साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 13:00 IST2022-08-08T13:00:10+5:302022-08-08T13:00:54+5:30
Kshitee jog: दर्जेदार अभिनयशैलीमुळे विशेष लोकप्रिय ठरलेली क्षिती लवकरच बॉलिवूडपटात झळकणार आहे.

रणवीर सिंगच्या चित्रपटात क्षिती जोगची वर्णी; 'रॉकी अँड रानी...'मध्ये साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका
नाटक, मालिका आणि सिनेमा अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे क्षिती जोग (kshitee jog). दर्जेदार अभिनयशैलीमुळे विशेष लोकप्रिय ठरलेली क्षिती लवकरच बॉलिवूडपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे यावेळी क्षितीने बाजी मारली असून ती चक्क अभिनेता रणवीर सिंगसोबत (ranveer singh) स्क्रीन शेअर करणार आहे. अलिकडेच एक पोस्ट शेअर करत तिने याविषयीची माहिती दिली.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या क्षितीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती रणवीर सिंगसोबत असल्याचं पाहायला मिळत आहे. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याचा 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' (rocky aur rani ki premkahani) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात क्षितीची वर्णी लागली आहे.
धर्मा प्रोडक्शनअंतर्गत तयार करण्यात आलेल्या रॉकी और रानी की प्रेमकहानी या चित्रपटाचं अलिकडेच चित्रीकरण पूर्ण झालं. त्यानिमित्ताने wrap party आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमध्ये क्षिती सहभागी झाली असून तिने या पार्टीतील व्हिडीओ शेअर केला आहे.
क्षितीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रणवीर तिला मिठी मारताना दिसत आहे. यावेळी क्षिती आणि रणवीरचं बाँण्डिंग पाहता या चित्रपटात क्षिती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकल्याचा अंदाज बांधता येतो.