शरद पोंक्षेंनी पाहिला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा; कौतुक करत म्हणाले, "दयेचे अर्ज..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 11:37 IST2024-03-25T11:35:42+5:302024-03-25T11:37:33+5:30
अभिनेते शरद पोंक्षेंची सिनेमावर काय प्रतिक्रिया येतेय हे पाहण्यासाठी सर्वच उत्सुक होते.

शरद पोंक्षेंनी पाहिला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा; कौतुक करत म्हणाले, "दयेचे अर्ज..."
रणदीप हुड्डाचा (Randeep Hooda) 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantrya Veer Savarkar) सिनेमा नुकताच रिलीज झाला. सध्या सिनेमाचं भरभरुन कौतुक होत आहे. रणदीप हुड्डाने सिनेमात स्वत:ला झोकून दिलं आहे. प्रत्यक्षात सावरकरांनाच समोर पाहतोय की काय अशी अनुभूती देणारा हा सिनेमा आहे. अभिनेते शरद पोंक्षेंची सिनेमावर काय प्रतिक्रिया येतेय हे पाहण्यासाठी सर्वच उत्सुक होते. अखेर काल रात्री शरद पोक्षेंनी (Sharad Ponkshe) फेसबुक पोस्ट करत सिनेमाबाबत व्यक्त झाले आहेत.
शरद पोंक्षेंनी दोन दिवसांपूर्वीच सर्वांना सिनेमा पाहा असं आवाहन केलं होतं. ते स्वत: अद्याप पाहू शकले नाहीत पण लवकरच पाहतील असंही त्यांनी लिहिलं होतं. काल रात्री त्यांनी सिनेमा पाहिल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया शेअर केली. ते लिहितात, "आज स्वा. सावरकर सिनेमा पाहिला. ८३ वर्षांचं आयुष्य ३ तासात दाखवायच अत्यंत अवघड पण हूड्डानी ते छान दाखवलय. विशेषतः अंदमान पर्व त्यात केलेले दयेचे अर्ज ह्या सर्व गोष्टी पाहणाऱ्याला नीट लक्षात येतील व गैरसमज दूर व्हायला नक्कीच मदत होईल. हुड्डा ह्यांचे अभिनंदन."
आज “ स्वा सावरकर” सिनेमा पाहिला.८३ वर्षांचं आयुष्य ३ तासात दाखवायच अत्यंत अवघड पण हूड्डा नी ते छान दाखवलय.विशेषतः अंदमान पर्व त्यात केलेले दयेचे अर्ज ह्या सर्व गोष्टी पाहणाऱ्याला नीट लक्षात येतील व गैरसमज दूर व्हायला नक्कीच मदत होईल. हुड्डा ह्यांचे अभिनंदन.
आज “ स्वा सावरकर” सिनेमा पाहिला.८३ वर्षांचं आयुष्य ३ तासात दाखवायच अत्यंत अवघड पण हूड्डा नी ते छान दाखवलय.विशेषतः अंदमान पर्व त्यात केलेले दयेचे अर्ज ह्या सर्व गोष्टी पाहणाऱ्याला नीट लक्षात येतिल व गैरसमज दूर व्हायला नक्कीच मदत होईल. हूड्डा ह्यांचे अभिनंदन. pic.twitter.com/LgBddgZHQ6
— SHARAD PONKSHE (@ponkshes) March 24, 2024
शरद पोंक्षेंनी रणदीप हुड्डासोबतचे काही फोटोही शेअर केलेत. रणदीप हुड्डाने सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेतलेली दिसते. त्याने तब्बल ३० किलो वजनही कमी केलं. त्याचा अभिनय पाहून प्रेक्षक प्रभावित झाले आहेत. सुप्रिया पिळगांवकर यांनीही सिनेमा पाहून कौतुक केलं.तर दुसरीकडे या सिनेमावर प्रोपगंडा सिनेमा म्हणून टीका होत आहे. काही डायलॉग राजकीय पक्षांना खटकणारेही आहेत. या सिनेमाने पहिल्या दिवशी १.०५ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने २.२५ कोटींचा गल्ला जमवला. रिलीजच्या तिसऱ्या दिवशी ३.३० कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हा सिनेमा टप्प्याटप्प्याने बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवतांना दिसत आहे.