एकावर एक तिकीट फ्री! मनोज वाजपेयीच्या नवीन 'भैयाजी' सिनेमासाठी खास ऑफर! करावी लागेल 'ही' गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 13:50 IST2024-05-29T13:47:00+5:302024-05-29T13:50:55+5:30
सोशल मीडियावर मनोज वाजपेयी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

एकावर एक तिकीट फ्री! मनोज वाजपेयीच्या नवीन 'भैयाजी' सिनेमासाठी खास ऑफर! करावी लागेल 'ही' गोष्ट
बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी कायमच त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. त्याचा 'भैय्या जी' चित्रपट 24 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. पण त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष जादू दाखवण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. अशा परिस्थितीत प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यासाठी निर्मात्यांनी एक नवीन युक्ती लढवली असून तिकिटांवर ऑफर्स जाहीर केल्या आहेत. हा सिनेमा पाहण्यासाठी निर्मात्यांनी प्रेक्षकांना एकावर एक तिकीट फ्री अशी ऑफर दिलीय.
सोशल मीडियावर मनोज वाजपेयी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यात चित्रपटाचे एक तिकीट खरेदी केल्यावर तुम्हाला एक मोफत तिकीट मिळेल, असं अपडेट दिलं आहे. ही ऑफर 29 आणि 30 मे पर्यंत फक्त दोन दिवसांसाठी वैध आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, BHAIYYYYAJI हा कोड बुकिंगच्या वेळी वापरावा लागेल. आता निर्मात्यांची ही कल्पना 'भैयाजी'चे कलेक्शन वाढवते की नाही हे पाहणे कमालीचे ठरेल.
'भैयाजी' हा मनोज वाजपेयींचा 100 वा सिनेमा आहे. या चित्रपटात त्याचा पुन्हा 'गँग्ज आॅफ वासेपूर'सारखा दबंग अंदाज आहे. २० कोटींच्या बजेटमध्ये निर्मित झालेल्या ह्या चित्रपटामध्ये मनोज वाजपेयीच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. अपूर्व सिंह कार्की दिग्दर्शित या चित्रपटाची पटकथा सामान्य दर्जाची असली तरी मनोजने आपल्या कॅरेक्टरला योग्य न्याय दिला आहे. थोडक्यात काय तर मनोजचा पुन्हा तोच जुना अंदाज बघण्यासाठी हा चित्रपट पाहायला हरकत नाही.