'रात्री ३ वाजताही तुम्हाला त्याच्या घरी जावं लागेल'; कास्टिंग काऊचविषयी मल्लिकाने उघड केलं गुपित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 13:06 IST2022-08-02T13:04:22+5:302022-08-02T13:06:25+5:30
Mallika sherawat: या मुलाखतीत तिने कलाविश्वातील काही गोष्टींवरील पडदा दूर करत सत्य परिस्थिती समोर मांडली आहे. यात कास्टिंग काऊचला नकार दिल्यामुळे अनेक प्रोजेक्ट्स हातून गेल्याचंही तिने सांगितलं.

'रात्री ३ वाजताही तुम्हाला त्याच्या घरी जावं लागेल'; कास्टिंग काऊचविषयी मल्लिकाने उघड केलं गुपित
कास्टिंग काऊच हा शब्द कलाविश्वासाठी नवीन नाही. बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अनेक नवोदित अभिनेत्रींना या कास्टिंग काऊचचा अनुभव आला आहे. आजपर्यंत अनेक अभिनेत्रींनी यावर उघडपणे भाष्यही केलं. यामध्येच आता अभिनेत्री मल्लिका शेरावतने (mallika sherawat) तिला सुरुवातीच्या काळात कशाप्रकारे या समस्येला सामोरं जावं लागलं हे सांगितलं आहे. इतकंच नाही तर एका व्यक्तीने चक्क पहाटे ३ वाजता तिला बोलावलं होतं असा खुलासाही तिने यावेळी केला.
बोल्ड फोटोमुळे कायम चर्चेत येणारी मल्लिका तिच्या दबंग अंदाजासाठीही चर्चेत येत असते. अलिकडेच तिने एक मुलाखत दिली या मुलाखतीत तिने कलाविश्वातील काही गोष्टींवरील पडदा दूर करत सत्य परिस्थिती समोर मांडली आहे. यात कास्टिंग काऊचला नकार दिल्यामुळे अनेक प्रोजेक्ट्स हातून गेल्याचंही तिने सांगितलं.
कास्टिंग काऊचवर काय म्हणाली मल्लिका?
"ए लिस्टमध्ये असलेल्या अनेक अभिनेत्यांनी माझ्यासोबत काम करायला नकार दिला. कारण काय, तर मी कॉम्प्रोमाइज करायला नकार दिला म्हणून. ज्या मुलींना ते कंट्रोलमध्ये ठेऊ शकतात आणि ज्या कॉम्प्रोमाइज करायला तयार होतात त्याच अभिनेत्री त्यांना आवडतात. पण, मी तशी नाही. ही माझी पर्सनालिटी नाही", असं मल्लिका म्हणाली.
पुढे ती म्हणते, "कोणाच्या इच्छांसाठी मी काम करु शकत नाही. जर एखादा अभिनेता रात्री ३ वाजता तुम्हाला फोन करुन सांगत असेल की, माझ्या घरी ये तर तुम्हाला जावं लागेल. आणि, जर तुम्ही याचा भाग झाला असाल आणि चित्रपटात एकत्र काम करत असाल तर तुम्हाला जावच लागेल. जर गेला नाहीत तर समजून जा हा चित्रपट तुम्ही गमावला."
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मल्लिका बॉलिवूडमधील अनेक गोष्टींवर उघडपणे भाष्य करत आहे. अलिकडेच तिने अभिनेत्री दिपिका पदुकोणवर निशाणा साधला होता.