Malaika Arorao : भारीच! अर्जुन कपूरच्या वाढदिवसाला मलायकाने केला जबरदस्त डान्स; लीक झाला Inside Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 12:43 IST2023-06-26T12:33:05+5:302023-06-26T12:43:29+5:30
Malaika Arorao And Arjun kapoor : मलायका अरोराने बॉयफ्रेंड अर्जुन कपूरच्या वाढदिवसानिमित्त जबरदस्त डान्स केला आहे.

Malaika Arorao : भारीच! अर्जुन कपूरच्या वाढदिवसाला मलायकाने केला जबरदस्त डान्स; लीक झाला Inside Video
अर्जुन कपूर आज त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. काल रात्री अर्जुन कपूरच्या घरी प्री-बर्थडे सेलिब्रेशन पार्टी मोठ्या थाटात पार पडली. अर्जुन कपूरच्या बहिणी अंशुला आणि खुशी कपूर व्यतिरिक्त त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोराही यावेळी दिसली. या सेलिब्रेशन नाईटची झलक समोर आली आहे. त्यामध्ये मलायका अरोराचा डान्स पाहायला मिळत आहे. पार्टीत मलायकाने जोरदार डान्स केला आहे.
मलायका अरोराने बॉयफ्रेंड अर्जुन कपूरच्या वाढदिवसानिमित्त जबरदस्त डान्स केला आहे. मलायका एका ऑफ-व्हाइट गाऊनमध्ये दिसली ज्यावर लाल हार्ट बनवलं होतं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मलायकाच्या व्हिडिओमध्ये ती पूर्णपणे डान्समध्ये मग्न झालेली दिसत आहे. मलायकाने यावेळी तिच्याच प्रसिद्ध 'छैया छैया' गाण्यावर डान्स केला, ज्यामध्ये तिने ठुमके लगावले आहेत.
या व्हिडिओवर लोकांच्या कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. एका युजरने म्हणूनच प्रत्येक मुलाला वहिनी आवडते असं म्हटलं आहे. तर काहीनी टीका करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले - पार्टीत दारूचा अतिरेक झाला आहे. 50 वर्षांपासून ती फक्त मुन्नी बदनाम हुई आणि छैया छैया या दोन गाण्यांवर नाचत असल्याचं म्हणाले. त्याचवेळी असे काही लोकही पुढे आले ज्यांनी तिच्यावर टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.