"माझा आळशी मुलगा..." मलायकाने शेअर केला अर्जुनचा न्यूड फोटो; नेटकरी भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 08:57 IST2023-05-29T08:57:01+5:302023-05-29T08:57:59+5:30
नुकताच मलायकाने अर्जुन कपूरचा एक न्यूड फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला

"माझा आळशी मुलगा..." मलायकाने शेअर केला अर्जुनचा न्यूड फोटो; नेटकरी भडकले
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) अर्जुन कपूरसोबतच्या (Arjun Kapoor) रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. दोघांच्या वयात कमालीचं अंतर आहे त्यामुळे त्यांना सतत ट्रोलही केलं जातं. पण तरी त्यांच्या नात्यात कोणताच फरक पडलेला नाही. नुकताच मलायकाने अर्जुन कपूरचा एक न्यूड फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आणि इंटरनेटवर खळबळ माजली. दोघंही अनेकदा एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
मलायकाने अर्जुनचा असा फोटो शेअर केला ज्यामध्ये अर्जुन बिना कपड्यांचा दिसत आहे. तसंच त्याने केवळ उशीच्या आधारे शरीर झाकलं आहे. हा फोटो स्टोरी म्हणून पोस्ट करत मलायकाने लिहिले, "माय व्हेरी ओन लेझी बॉय'. तर तिकडे मलायकाची ही स्टोरी अर्जुन कपूरनेही रिपोस्ट केली. मात्र त्याने कोणतंच कॅप्शन दिलेलं नाही.
पापाराझी व्हिरल भयानीने हा फोटो पोस्ट केला आहे. तर यावर नेटरकऱ्यांनी अक्षरश: शिव्या दिल्या आहेत. 'यांना शिव्या खाण्याची हाऊस आहे आणि हे आम्हाला ट्रोलर म्हणतात', 'उशीचा दुरुपयोग केला जात आहे' अशा शब्दात नेटकऱ्यांनी दोघांचा समाचारच घेतला आहे.
वयातील अंतरामुळे होतात ट्रोल
मलायकाने अरबाज खानला २०१७ मध्ये घटस्फोट दिला. घटस्फोटाच्या आधीपासूनच तिच्या आणि अर्जुन कपूरच्या नात्याची चर्चा होती. काही वर्षांनी दोघांनी आपलं नातं कबूल केलं. आता दोघंही बिन्धास्त माध्यमांसमोर येत असतात. अनेकदा त्यांना ट्रोलही केलं जातं कारण मलायका अर्जुन कपूरहून 12 वर्षांनी मोठी आहे. तसंच तिला २० वर्षांचा एक मुलगाही आहे.