मलायका अरोरानं मुंबईतील फ्लॅट भाड्याने दिला; दर महिन्याला किती होणार कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 13:16 IST2026-04-02T12:35:47+5:302026-04-02T13:16:11+5:30
बॉलिवूडमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत, जिथे कलाकार केवळ अभिनयावर नाही, तर गुंतवणुकीतूनही कमाई करताना दिसतात.

मलायका अरोरानं मुंबईतील फ्लॅट भाड्याने दिला; दर महिन्याला किती होणार कमाई
बॉलिवूडची 'छैय्या छैय्या' गर्ल मलायका अरोरा (Malaika Arora) केवळ तिच्या फिटनेस आणि फॅशनसाठीच नाही, तर तिच्या जबरदस्त 'बिझनेस माइंड'साठीही ओळखली जाते. मलायकाने अरोरा हिने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, कमाई फक्त चित्रपटातूनच होत नाही तर रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटमधूनही मोठा पैसा मिळू शकतो. मलायकानं मुंबईतील अतिशय उच्चभ्रू अशा वांद्रा पश्चिम (Bandra West) भागातील फ्लॅट भाड्याने दिला आहे. सध्या तिचा हा निर्णय सोशल मीडियावर आणि गुंतवणूकदारांमध्ये चर्चेचा विषय ठरतो आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मलायका अरोराचा हा फ्लॅट वांद्रे येथील प्रतिष्ठित 'विदा' (Vida) इमारतीत स्थित आहे. मार्च २०२६ मध्ये या व्यवहाराची अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. वांद्रे भागात समुद्राभिमुख (Sea-facing) घरांना मोठी मागणी असते आणि मलायकाने याच संधीचा फायदा घेत आपली मालमत्ता भाड्याने दिली आहे. मलायकाच्या या फ्लॅटसाठी भाडेकरूने २० लाख सुरक्षा ठेव (Security Deposit) जमा केली आहे.
असे असेल भाड्याचे गणित
सुरुवातीचे भाडे: ₹३.१० लाख प्रति महिना.
वार्षिक वाढ: दरवर्षी भाड्यात ५% वाढ होणार आहे.
३ वर्षांतील एकूण कमाई: अंदाजे १.१७ कोटी.
याचाच अर्थ असा की, दुसऱ्या वर्षी हे भाडे ३.२५ लाख होईल आणि तिसऱ्या वर्षी त्यात आणखी वाढ होईल.
वांद्रे पश्चिम इतके महाग का?
वांद्रे हा भाग मुंबईतील सेलिब्रिटी आणि बड्या व्यावसायिकांची पहिली पसंती आहे. उत्तम कनेक्टिव्हिटी, वांद्रे-वरळी सी लिंक, जवळच असलेले बीकेसी (BKC) आणि आलिशान रेस्टॉरंट्समुळे येथील मालमत्तेचे भाव गगनाला भिडलेले असतात. घरबसल्या करोडोंची कमाई करण्याचा मलायकाचा हा मास्टर प्लॅन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.