वय वाढलं तरी बोल्डनेस संपेना! डिप नेक गाऊनमध्ये मलायकाने केला रॅम्पवॉक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 13:47 IST2022-07-28T13:47:16+5:302022-07-28T13:47:59+5:30
Malaika arora: पहिल्यांदाच मलायकाचा हा लूक पाहून तिला ट्रोल न करता नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

वय वाढलं तरी बोल्डनेस संपेना! डिप नेक गाऊनमध्ये मलायकाने केला रॅम्पवॉक
आपल्या बोल्डनेसमुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा( malaika arora). वयाची ४५ वर्ष पार केल्यानंतरही मलायकाचा फिटनेस आणि बोल्डनेस जराही कमी झालेला नाही. त्यामुळे अनेकदा ती चर्चेत येत असते. यात बऱ्याचदा तिला रिव्हिलिंग कपडे परिधान केल्यामुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र, या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत ती तिची फॅशन कॅरी करत असते.
सध्या सोशल मीडियावर मलायका एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती रॅम्प वॉक करताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी तिने ब्लँक रंगाचा डिप नेक गाऊन परिधान केला आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मलायकाने डीप नेक असलेला गाऊन परिधान केला आहे. हा गाऊन नेटचा असून पायाजवळही त्याला मोठी कट आहे. त्यामुळे मलायकाचा हा लूक पाहून नेटकऱ्यांनी पुन्हा त्यावर कमेंट करायला सुरुवात केली.
दरम्यान, पहिल्यांदाच मलायकाचा हा लूक पाहून तिला ट्रोल न करता नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. ''या लूकमध्ये मलायका ४८ वर्षांची नाही तर ३० वर्षांची वाटते'', असं एकाने म्हटलं आहे. तर, "या वयातही स्वत:ला फिट ठेवणं खरंच कौशल्य आहे", असं आणखी एका युजरने म्हटलं आहे.