Malaika Arora : बाई आता लग्नाचं बघा, ही काही अमेरिका नाही..., मलायकाने अर्जुनला किस केलं, झाली ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 16:16 IST2023-01-01T16:14:16+5:302023-01-01T16:16:21+5:30
Malaika Arora Kisses Arjun Kapoor : नव्या वर्षाच्या निमित्तानं मलायकानं अर्जुन कपूरला किस करतानाचा फोटो शेयर केला. अर्जुननेही हाच सेम फोटो शेअर केला आणि लोकांनी त्यांना ट्रोल करायला सुरूवात केली.

Malaika Arora : बाई आता लग्नाचं बघा, ही काही अमेरिका नाही..., मलायकाने अर्जुनला किस केलं, झाली ट्रोल
बॉलिवूडने नव्या वर्षाचं जबरदस्त सेलिब्रेशन केलं. अर्धअधिक बॉलिवूड न्यू ईअरच्या सेलिब्रेशनसाठी विदेशात रवाना झाली. काहींनी मात्र भारतात मुंबईबाहेर न्यू ईअरचं सेलिब्रेशन केलं. बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स मलायका अरोरा (Malaika Arora ) व अर्जुन कपूर ( Arjun Kapoor)हे दोघे नव्या वर्षाच्या स्वागतासाठी राजस्थानच्या रणथंभोर येथे पोहोचले. मलायकाने नव्या वर्षाची पहिली पोस्ट अर्जुन कपूरसोबत केली.
नव्या वर्षाच्या निमित्तानं मलायकानं अर्जुन कपूरला किस करतानाचा फोटो शेयर केला आहे. अर्जुननेही हाच सेम फोटो शेअर करत चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्यात. पण दोघांनीही हा फोटो शेअर केला आणि लोकांनी त्यांना ट्रोल करायला सुरूवात केली.
कित्येकांनी त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. ‘बाई आता लग्नाचं बघ...नवीन वर्ष सुरु झालंआहे,’असं एका युजरने लिहिलं. ‘मॅडम तुम्ही सीनिअर सिटीजन असून असं वागता, देशाच्या तरूणाईवर काय परिणाम होईल. किमान देशाच्या तरूणाईला बघता तरी असं वागू नका. ही काही अमेरिका नाही,’अशा शब्दांत एका युजरने मलायकाला ट्रोल केलं. ‘इस प्यार को क्या नाम दूं...,’अशी कमेंट एका युजरने केली. ‘यांच्या या अशाच वागण्यामुळे 2022 हे वर्ष संपलंय... नाहीतर आणखी दोन तीन महिने थांबलं असतं...,’अशी मजेशीर कमेंट अन्य एका युजरने केली आहे.
राजस्थानला मलायका व अर्जुनसोबत त्यांचा मित्र परिवारही त्या पर्यटनामध्ये सहभागी झाला आहे. त्यात वरुण धवन, नताश दलाल आणि मोहित मारवाह हेही त्यांच्यासोबत आहेत.
मलायका व अर्जुन दोघंही दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. ‘मुव्हिंग इन विद मलायका’ या शोमध्ये मलायकाने तिच्या व अर्जुनच्या लग्नाबद्दलही सांगितलं होतं. लग्नाचा इरादा आहे की नाही? असं फराह खानने विचारल्यावर, भविष्यात माझ्यासोबत काय घडणार आहे माहित नाही. मी अर्जुनसोबत आनंदी आहे. जग आमच्याबद्दल जे काही बोलतं, त्याची मला पर्वा नाही, असं ती म्हणाली होती.