मलायकाला अर्जुन कपूरने अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, तर करिना म्हणाली - डार्लिंग मल्ला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 15:20 IST2020-10-23T15:19:59+5:302020-10-23T15:20:46+5:30

एकीकडे करिना कपूर खानने मलायकाल वेगळ्या अंदाजात शुभेच्छा दिल्या तर कथित बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरनेही मजेदार मेसेज लिहित तिला शुभेच्छा दिल्या.

Malaika Arora Birthday : Arjun Kapoor and Kareena wished her with insta post | मलायकाला अर्जुन कपूरने अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, तर करिना म्हणाली - डार्लिंग मल्ला...

मलायकाला अर्जुन कपूरने अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, तर करिना म्हणाली - डार्लिंग मल्ला...

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आज(२३ ऑक्टोबर)ला तिचा ४७वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने तिच्या जवळच्या लोकांनी आणि मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. एकीकडे करिना कपूर खानने मलायकाल वेगळ्या अंदाजात शुभेच्छा दिल्या तर कथित बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरनेही मजेदार मेसेज लिहित तिला शुभेच्छा दिल्या.

करिनाने इस्टाग्रामवर मलायकासोबतचा सेल्फी शेअर केला आणि लिहिले की, 'हॅपी बर्थडे डार्लिंग मल्ला...आपण आपलं जेवण, सोबत एकसारख्या टी-शर्ट घालून मुलींच्या रात्रींची नेहमीच मजा घेतली आहे. मी तुला खूपसारे ग्लूटन फ्री ब्रेड, जिनचे छोटे थेंब आणि सोबतच खूपसारे योगासने मिळण्याची कामना करते'. (VIDEO : २० वर्षांची होती मलायका जेव्हा अरबाजला पहिल्यांदा भेटली, इथून आले होते जवळ...)

तेच अर्जुन कपूरने मलायकाचा एक छान फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलाय. सोबत लिहिले की, Happy Birthday My Fool. दरम्यान, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर नुकतेच कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. आता दोघांनीही कोरोनाला मात देऊन कामाला सुरूवात केली आहे.

इंडियाज बेस्ट डान्सरमध्ये वापसी

कोविडचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर तिने स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं होतं. आता ती परत आली असून इतर जजसोबतच स्पर्धकही तिचं स्वागत करत आहेत. टेरेंससोबतच स्पर्धकांनी डान्स परफॉर्मन्स करून मलायकाचं स्वागत केलं होतं. (Happy Birthday Malaika: म्हणून मलायका अरबाज खानपासून झाली होती विभक्त, घटस्फोटच्या आदल्या रात्री घडलं होतं असे काही)

टेरेंस कोरोना काळापासूनच फॅन्ससोबत जुळलेला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शोमधील मोमेंट्स तो नेहमी शेअर करत असतो. हॅशटॅग व्लॉगेश्वरीच्या माध्यमातून तो काही इंटरेस्टींग गोष्टी शेअर करत असतो. नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात तो मलायका अरोराचं स्वागत करताना दिसत आहे. यात टेरेंस म्हणाला की, मी तुला खूप मिस केलं, पण मलायकाने त्याचा हा दावा धुडकावून लावला आणि म्हणाली की, तू खोटं बोलतोय. मला फक्त गीताने मिस केलं.
 

Web Title: Malaika Arora Birthday : Arjun Kapoor and Kareena wished her with insta post