Bday Special : Ad video where Malaika Arora and Arbaaz Khan came together first time | VIDEO : २० वर्षांची होती मलायका जेव्हा अरबाजला पहिल्यांदा भेटली, इथून आले होते जवळ...

VIDEO : २० वर्षांची होती मलायका जेव्हा अरबाजला पहिल्यांदा भेटली, इथून आले होते जवळ...

बॉलिवूड अभिनेत्री-डान्सर मलायका अरोरा आज तिचा ४७वा वाढदिवस साजरा करत आहे. मलायकाच्या वेगवेगळ्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. अशात मलायका एक खास व्हिडीओ समोर आला आहे. मलायका जेव्हा २० वर्षांची होती तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. हा एका जाहिरातीचा व्हिडीओ असून यात ती पहिल्यांदा अरबाज खानसोबत दिसली होती. यादरम्यान दोघांनाही पहिल्या नजरेतच एकमेकांवर प्रेम जडलं होतं.

१९९३ मध्ये मलायका अरोरा आणि अरबाज खानने कॉफी ब्रॅन्ड 'Mr Coffee' साठी एक जाहिरात शूट केली होती. त्यावेळी ही जाहिरात चांगलीच चर्चेत होती. कारण यात जरा जास्तच ग्लॅमर दिसला होता. जाहिरातीची जेवढी चर्चा होत  राहिली तेवढी मलायका आणि अरबाजची बॉन्डींग चांगली झाली. यात दोघांनी आपल्या परफॉर्मन्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.(प्रियांका चोप्राच्या गाण्यावर मलायका अरोराचा BOLD डान्स, व्हिडीओ झालाय व्हायरल)

या जाहिरातीवेळी मलायका केवळ २० वर्षांची होती. त्यानंतर साधारण ५ वर्षे मलायका आणि अरबाज रिलेशनशिपमध्ये होते. नंतर त्यांनी १९९८ मध्ये लग्नाचा निर्णय घेतला. तेव्हा मलायका २५ वर्षांची होती. लग्नाच्या ४ वर्षांनंतर २००२ मध्ये मलायका मलायका आई झाली. तिने मुलगा अरहानला जन्म दिला.

मात्र, दोघांच्या १९ वर्षांच्या सुखी संसारने २०१७ मध्ये दम तोडला. दोघेही वेगळे झाले. आता मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघे लवकरच लग्न करणार असल्याचंही बोललं जात आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bday Special : Ad video where Malaika Arora and Arbaaz Khan came together first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.