मलायका अरोरा आज आपला 47वा वाढदिवस साजरा करते आहे. मलायका आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफला घेऊन नेहमी चर्चेत असते. आज आम्ही तुम्हाला मलायकाच्या पर्सनल लाईफशी संबंधीत काही गोष्टी सांगणार आहोत कदाचित त्या तुम्हाला माहिती नसतील. आपल्याला हे माहिती आहे  १८ वर्षांच्या संसारानंतर मलायका आणि अरबाज विभक्त झाले. मलायकासाठी हा निर्णय घेणं खूपच कठीण होते. ज्यावेळी मलाकाने आपला हा निर्णय कुटुंबियांना सांगितला त्यावेळी त्यांचे काय म्हणणे होते. 

एकदा करिना कपूरच्या रेडिओ चॅट शोमध्ये बोलताना मलायका अरोरा म्हणाली होती, जेव्हा माझ्या घटस्फोटाबद्दल मी फ्रेंड्स व घरातल्यांशी बोलले तेव्हा सगळ्यांनी मला पुन्हा एकदा विचार करण्यास सांगितला होता. ज्या व्यक्तींचं माझ्यावर प्रेम आहे, ज्यांना माझी काळजी आहे ती प्रत्येक व्यक्ती मला असाच सल्ला देणार याची मला कल्पना होती. कोणीही मला उत्स्फूर्तपणे हा घे घटस्फोट.. फार विचार करू नकोस असं म्हणणार नव्हतं.

एका रात्रीपूर्वी कुटुंबिय म्हणाले..
मलायका पुढे सांगितले होते की, ‘घटस्फोटाच्या आदल्या रात्री मी माझ्या कुटुंबासोबत बसले होते. सगळ्यांनी मला पुन्हा एकदा विचार करायला सांगितला. जर तुझा हा अंतिम निर्णय असेल तर आम्हाला तुझा अभिमान आहे. आमच्या दृष्टीने तू एक कणखर महिला आहेस. करिनाने यानंतर मलायकाला प्रश्न विचारला होता की, नातं तुटल्यावर कसं वाटतं? दुसरं नातं जोडलं जाऊ शकतं का? याचं उत्तर देताना मलायका म्हणाला की, हो का नाही. पहिलं नातं संपल्यावर पुढे जाणं फार गरजेचे असते. तुम्हाला तुमचा वेळ मिळतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला तुमचा बेड कोणासोबत शेअर करावा लागत नाही.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Happy birthday malaika arora here is the reason why malaika divorced with arbaaz khan know about her married life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.