'बॉलिवूड मला अफॉर्ड करू शकत नाही' म्हणून फसलेल्या सुपरस्टार महेश बाबूने दिलं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 15:03 IST2022-05-11T15:01:30+5:302022-05-11T15:03:03+5:30
Mahesh Babu : 'बॉलिवूड त्याला अफॉर्ड करू शकत नाही, असं त्याचं वक्तव्य त्याला महागात पडलं आहे. आता आपल्या या वक्तव्यावर महेश बाबूने स्पष्टीकरण दिलं आहे.

'बॉलिवूड मला अफॉर्ड करू शकत नाही' म्हणून फसलेल्या सुपरस्टार महेश बाबूने दिलं स्पष्टीकरण
साऊथचा सुपरस्टार महेश बाबूच्या (Mahesh Babu) एका वक्तव्यामुळे चांगलाच वाद पेटला आहे. त्याने त्याच्या बॉलिवूड डेब्यूबाबत असं वक्तव्य केलं होतं की, तो सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला. 'बॉलिवूड त्याला अफॉर्ड करू शकत नाही, असं त्याचं वक्तव्य त्याला महागात पडलं आहे. आता आपल्या या वक्तव्यावर महेश बाबूने स्पष्टीकरण दिलं आहे.
महेश बाबूच्या पीआर टीमकडून अभिनेत्याचं स्पष्टीकरण जारी करण्यात आलं आहे. आपल्या स्पष्टीकरणात सुपरस्टार म्हणाला की, त्याचं सिनेमावर प्रेम आहे आणि तो सर्वच भाषेंचा सन्मान करतो. तो म्हणाला की, मी जिथे (साऊथ इंडस्ट्रीत) सिनेमे करत आहे ते सिनेमे करण्यासाठी मी कंफर्टेबल आहे. मला आनंद आहे की, माझं स्वप्न पूर्ण होत आहे. कारण तेलुगू सिनेमाला मोठं यश मिळत आहे.
काय म्हणाला होता महेश बाबू?
महेश बाबू त्याच्या आगामी सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी म्हणाला होता की, 'मला हिंदी सिनेमांकडून अनेक ऑफर्स मिळतात. पण मला वाटतं ते लोक मला अफॉर्ड करू शकत नाहीत. मला अशा इंडस्ट्रीत काम नाही करायचं आहे जी मला अफॉर्ड करू शकत नाही. मला स्टारडम आणि सन्मा इथे साऊथ इंडस्ट्रीत मिळाला आहे. ती मोठी बाब आहे'.
तो म्हणाला होता की, 'याच कारणाने मी आपली इंडस्ट्री सोडून दुसऱ्या इंडस्ट्रीचा भाग होण्याचा विचार करत नाही. मी नेहमी सिनेमे करणं आणि मोठं होण्याचा विचार करतो. माझं स्वप्न आता खरं होत आहे आणि मी यापेक्षा जास्त आनंदी होऊ शकत नाही'.
महेश बाबूच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर त्याचा आगामी सिनेमा Sarkaru Vaari Petla १२ मे रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. त्याने हेही सांगितलं की, तो पुढील सिनेमा एसएस राजामौलीसोबत करेल. हा एक पॅंन इंडिया सिनेमा असेल.