"आम्हाला जीवे-मारण्याच्या धमक्या मिळतायेत...", मोनालिसा-फरमानच्या व्हिडीओने खळबळ, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 11:15 IST2026-03-21T11:12:50+5:302026-03-21T11:15:21+5:30

'महाकुंभ गर्ल' मोनालिसा अन् पती फरमानला जीवे मारण्याची धमकी, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

maha kumbh girl monalisa and husband farman khan receive death threat seeking help  | "आम्हाला जीवे-मारण्याच्या धमक्या मिळतायेत...", मोनालिसा-फरमानच्या व्हिडीओने खळबळ, नेमकं प्रकरण काय?

"आम्हाला जीवे-मारण्याच्या धमक्या मिळतायेत...", मोनालिसा-फरमानच्या व्हिडीओने खळबळ, नेमकं प्रकरण काय?

Monalisa-Farman Khan: मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात कुंभमेळ्यामुळे व्हायरल झालेल्या मोनालिसा भोसलेचं लग्न हा चर्चेचा विषय ठरला आहे.दिसायला सुंदगर आणि निळ्या डोळ्यांची मोनालिसा ही चित्रपटात दिसणार म्हणून  तिची एक वेगळीच चर्चा होतीच. दरम्यान, मागील आठवड्यात तिने फरमान खान या तिच्या प्रियकराशी तिने लग्न केलं. या दोघांनी हिंदू रितीप्रमाणे लग्न केलं. एकीकडे  या लग्नावर मोनालिसाच्या कुटुंबियांनी  या प्रश्न उपस्थित केले तर काहींनी या लग्नाला लव्ह जिहादचं नाव दिलं.अशातच या जोडप्याने शेअर केलेल्या एका व्हिडीओने एकच खळबळ उडवून दिली आहे.

दरम्यान, मोनालिसाने तिच्या सोशल मिडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये मोनालिसा आणि फरमान दोघांनीही मदतीची मागणी केली.लग्नानंतर मोनालिसा आणि फरमानला जीवे-मारण्याच्या धमक्या येत असल्याचं त्यांना म्हटलं आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त आणि प्रसारमाध्यमांना याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी सुद्धा केली आहे. 

मोनालिसा नेमकं काय म्हणाली...

मोनालिसाने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे, " नमस्कार,  मोनालिसा भोसले आहे आणि हे माझे पती फरमान खान आहेत. मी हा व्हिडिओ एका पत्रासोबत सर्वांना पाठवत आहे, कृपया आम्हाला मदत करा.  आम्हाला जीवे-मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत." दरम्यान, या संबंधित प्रकरणाची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

२०२५ च्या महाकुंभ मेळ्यादरम्यान मोनालिसा भोसलेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यावर ती पहिल्यांदा चर्चेत आली. रुद्राक्ष माळा विकतानाचे फोटो प्रचंड व्हायरल झाले आणि मोनालिसा रातोरात लोकप्रिय झाली. वृत्तानुसार, ती आणि फरमान एका चित्रपटाच्या प्रोजेक्टदरम्यान भेटले.या दरम्यान, त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर या नात्याचं प्रेमात रूपांतर झालं.

Web Title : अंतरधार्मिक विवाह के बाद मोनालिसा और फरमान को जान से मारने की धमकी।

Web Summary : हाल ही में शादी के बंधन में बंधे मोनालिसा भोसले और फरमान खान ने जान से मारने की धमकी मिलने की शिकायत की है। उन्होंने मुख्यमंत्री, पुलिस और मीडिया से मदद की गुहार लगाई है, क्योंकि उन्हें अपने अंतरधार्मिक विवाह के बाद खतरा महसूस हो रहा है।

Web Title : Monalisa and Farman receive death threats after interfaith marriage.

Web Summary : Monalisa Bhosle and Farman Khan, recently married, report receiving death threats. They request help from the Chief Minister, police, and media, fearing for their safety after facing backlash and controversy surrounding their interfaith union.