माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 12:18 IST2024-05-12T12:18:24+5:302024-05-12T12:18:58+5:30
Madhuri dixit: सोशल मीडियावर माधुरीच्या व्हिडीओची तुफान चर्चा रंगली आहे.

माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित (madhuri dixit) आजही तिच्या एव्हरग्रीन ब्युटीमुळे चर्चेत येत असते. माधुरीने ९०चा काळ चांगलाच गाजवला त्यामुळे तिची कायम सोशल मीडियावर चर्चा रंगत असते. सध्या नेटकऱ्यांमध्ये तिचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका अवॉर्ड फंक्शनमध्ये माधुरी चक्क साजन सिनेमात वापरलेला ड्रेस परिधान केला होता.
सोशल मीडियावर सध्या माधुरीचा ३३ वर्ष जुना एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ १९९१ मध्ये झालेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचा आहे. या पुरस्कार सोहळ्यात माधुरीला 'दिल' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी माधुरीने 'साजन' सिनेमा वापरलेला ड्रेस परिधान केला होता. हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांनी तिच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे.
माधुरीने साजन सिनेमात पिंक आणि ग्रीन रंगाचा पंजाबी सूट परिधान केला होता. त्याच्यासोबत तिने गोल्डन इअर रिंग्स, मोठी टिकली आणि मोकळे केस असा गेटअप केला होता. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यावर चाहत्यांनी पुन्हा एकदा तिच्या साजन सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.