माधुरी दीक्षितला पाहून जॅकी श्रॉफ यांनी असं काय केलं? अभिनेत्रीला वाटलं अनकंफर्टेबल; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 11:18 IST2026-01-21T11:17:19+5:302026-01-21T11:18:10+5:30
माधुरी आणि जग्गू दादाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

माधुरी दीक्षितला पाहून जॅकी श्रॉफ यांनी असं काय केलं? अभिनेत्रीला वाटलं अनकंफर्टेबल; Video व्हायरल
८० ते ९० च्या दशकातील लोकप्रिय कलाकारांमध्ये माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफचं नाव येतंच. 'देवदास' या सुपरहिट सिनेमात ते एकत्र दिसले होते. त्याआधी 'परिंदा', 'राम लखन', 'लज्जा', 'संगीत' अशा अनेक सिनेमांमध्ये त्यांनी स्क्रीन शेअर केली आहे. २००२ साली आलेल्या 'देवदास' नंतर ते पुन्हा एकत्र दिसले नाहीत. आता नुकतंच एका इव्हेंटमध्ये माधुरी आणि जॅकी एकमेकांसमोर आले. यावेळी जॅकी श्रॉफने असं काही केलं ज्यामुळे माधुरी अनकंफर्टेबल झालेली दिसली.
माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ नुकतेच 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या सेटवर पोहोचले. दोघांना इतक्या वर्षांनी सोबत पाहून चाहतेही आठवणीत रमले. माधुरीने यावेळी डार्क ब्लॅक आणि त्यावर लाल रंगाची डिझाईन असलेला सुंदर वनपीस घातला होता. या वयातही ती कमालीची सुंदर दिसत होती. तर जॅकी श्रॉफ नेहमीसारखेच सूट बूटमध्ये आले होते. माधुरीला पाहून जॅकी तिच्याजवळ आले आणि तिचा हात पकडला. नंतर त्यांनी तिच्या हाताला किस केलं. यावेळी माधुरी जरा अनकंफर्टेबल झालेली दिसली. नंतर दोघांनी सोबत कॅमेऱ्यासमोर पोज दिली.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे. 'असं वाटतंय माधुरीला हे वागणं आवडलेलं नाही','माधुरी कंफर्टेबल दिसत नाही..ती हात झटकत आहे','जॅकी सरांसोबत उभं राहायला माधुरीला जरा विचित्र वाटतंय हे तिच्या चेहऱ्यावरुन दिसतंय' अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. 'जॅकी सरही का अनकंफर्टेबल वाटत आहेत?' असाही प्रश्न एकाने विचारला आहे. तर अनेकांनी माधुरीच्या सौंदर्याचं भरभरुन कौतुक केलं आहे.