माधुरी दीक्षितच्या 'माँ बहन' सिनेमाची चर्चा, तृप्ती डिमरी लेकीच्या भूमिकेत तर दुसरी मुलगी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 12:52 IST2026-02-06T12:51:17+5:302026-02-06T12:52:17+5:30
कोण आहे माधुरीची धाकटी लेक?

माधुरी दीक्षितच्या 'माँ बहन' सिनेमाची चर्चा, तृप्ती डिमरी लेकीच्या भूमिकेत तर दुसरी मुलगी कोण?
नेटफ्लिक्सने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या आगामी वेबसीरिज, सिनेमांचा पेटारा उघडला. येत्या काळात प्रेक्षकांना भरघोस कंटेंट पाहायला मिळणार आहे. काही जुन्या सीरिजचा पुढचा सीझन येत आहे तर बाकी नवीन कंटेंटही येणार आहे. माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी यांच्या आगामी 'माँ बहन' सिनेमाचीही झलक नेटफ्लिक्सने दाखवली. यामध्ये माधुरीच्या दोन लेकी दाखवल्या आहेत. एक तृप्ती तर दुसरी मुलीचा चेहरा नवा आहे. ती दुसरी मुलगी कोण याची ओळख आता समोर आली आहे. कोण आहे ती?
माँ बहन या सिनेमात माधुरी दीक्षित (रेखा), तृप्ती डिमरी (जया) आणि धरणा दुर्गा (सुषमा) मुख्य भूमिकेत आहे. याचा टीझर नुकताच रिलीज झाला. तृप्ती मोठी बहीण तर धरणा धाकटी आहे. या तिघी स्थानिक भाषेत बोलताना दिसत आहेत. हा एक डार्क कॉमेडी सिनेमा आहे. नेटफ्लिक्सने सिनेमाची घोषणा केली तेव्हा झालेल्या इव्हेंटमध्ये माधुरी, तृप्ती, रवी किशन हे सर्व कलाकार दिसले होते. दरम्यान सिनेमात तृप्तीच्या बहिणीच्या भूमिकेत दिसलेली धरणा दुर्गा आहे तरी कोण?
तर धरणा दुर्गा ही सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आहे. ती सोशल मीडियावर कॉमेडी रील्स बनवत असते. तिचे इन्स्टाग्रामवर १.७ मिलियन फॉलोअर्स आहेत. अनेकांनी तिचे रील्स पाहिलेही असतील. घरगुती वातावरणावर तिचे विनोदी व्हिडीओ असतात ज्यात तिच्यासोबत कधी तिची आजी आणि आईही दिसतात. तिच्या हलक्याफुलक्या विनोदांवर नेटकरी तुफान हसतात. तिच्या एकेका व्हिडीओला मिलियनमध्ये व्ह्यूज मिळतात.
धरणाचा हाच विनोदी अंदाज पाहून तिला थेट हिंदी सिनेमा मिळाला आहे. माधुरी आणि तृप्ती डिमरीसोबत तिला स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली आहे. सिनेमा मे मध्ये ऑन फ्लोर जाणार आहे. सुरेश त्रिवेणी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.