एकाच घरात राहून एकमेकांना भेटत नाही विकी-कतरिना, कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 18:08 IST2023-11-18T18:07:44+5:302023-11-18T18:08:35+5:30
Katrina Kaif-Vicky Kaushal : सध्या कतरिना कैफ आणि विकी कौशल आपापल्या चित्रपटांमध्ये व्यग्र आहेत. अलीकडेच कतरिनाने सांगितले की, हल्ली त्या दोघांना एकमेकांना भेटायलाही वेळ मिळत नाही.

एकाच घरात राहून एकमेकांना भेटत नाही विकी-कतरिना, कारण आलं समोर
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या 'टायगर ३'(Tiger 3) मुळे चर्चेत आहे. चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. पुन्हा एकदा झोया आणि टायगरची जोडी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाल्याने चाहते खूश झाले आहेत. कतरिना कैफच्या अॅक्शन सीन्सला थिएटरमध्ये खूप टाळ्या मिळत आहेत.कतरिनाच्या चित्रपटानंतर आता विकी कौशलचा चित्रपट 'सॅम बहादूर' चित्रपटगृहात रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. अशा परिस्थितीत दोन्ही स्टार्स आपापल्या कामात खूप व्यस्त आहेत. याबद्दल बोलताना कतरिनाने सांगितले की, सध्या तिच्या घरी कसे वातावरण आहे.
ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान कतरिनाने सांगितले की, हा काळ आम्हा दोघांसाठी खूप व्यस्त आहे. एकाच घरात राहूनही आम्हा दोघांना एकमेकांना नीट भेटण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. मी आणि विकी दोघेही आपापल्या चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. आम्ही दोघेही एकमेकांना मिस करतो हे सांगितले आहे. निदान आम्ही एकत्र दिवाळी साजरी केली.
कतरिनाने विकी कौशलच्या सॅम बहादूर या चित्रपटावरही बोलली. ती म्हणाली की, 'मी सॅम बहादूरसाठी खूप उत्सुक आहे. मला वाटते की विकी एक उत्कृष्ट कलाकार आहे आणि तो चित्रपटात कसा काम करतो हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. हा चित्रपट १ डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.