Laal Singh Chaddha: विवेक अग्निहोत्रीच्या निशाण्यावर आमिर खान? म्हणाले- 60 वर्षांचा हिरो आणि....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 04:21 PM2022-08-13T16:21:06+5:302022-08-13T16:30:20+5:30

Laal Singh Chaddha : आमिर खानचे नाव न घेता चित्रपट विवेक अग्निहोत्री यांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे. सध्या त्यांच्या या ट्विटची नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे.

Laal Singh Chaddha Vivek Agnihotri takes dig at Aamir Khans film | Laal Singh Chaddha: विवेक अग्निहोत्रीच्या निशाण्यावर आमिर खान? म्हणाले- 60 वर्षांचा हिरो आणि....

Laal Singh Chaddha: विवेक अग्निहोत्रीच्या निशाण्यावर आमिर खान? म्हणाले- 60 वर्षांचा हिरो आणि....

googlenewsNext

Laal Singh Chaddha box office opening:आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha ) हा सिनेमा येणार म्हटल्यावर सगळ्यांच्याच अपेक्षा वाढल्या होत्या. आमिरच्या या बहुप्रतिक्षीत सिनेमाची दीर्घकाळापासून चर्चा होती. अखेर रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज झाला. खरं तर रिलीजआधी #BoycottLalSinghchaddha सोशल मीडियावर ट्रेंड झाला होता. सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत असताना हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत आमिरने प्रचंड मेहनत घेतली. दणक्यात प्रमोशन केलं. मात्र शेवटी ज्याची भीती होती, तेच घडलं. पहिल्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईनं सर्वांची निराशा केली. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे, पहिल्याच दिवशी या सिनेमाचे तब्बल 1300 स्क्रीनवरून काढून टाकण्यात आला. 'द काश्मीर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनाही हा चित्रपट फारसा समजलेला नाही. चित्रपटापेक्षा जास्त त्यांचे ट्विट व्हायरल होत आहे. याची सर्वत्र चर्चा होत आहे.

आमिर खानचे नाव न घेता चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे. विवेक अग्निहोत्री म्हणाले की, सध्या बॉलिवूड बुडत आहे, कारण 60 वर्षांचा अभिनेता  20-30 वर्षांची अभिनेत्रीसोबत रोमान्स करत आहे. अशात प्रेक्षकांना तुम्ही नॅचरल दाखवत आहात का? सोबतच व्हीएफएक्सच्या मदतीने चित्रपटातील किती गोष्ट बदलल्या जात आहेत.

 

रिपोर्टनुसार ‘लाल सिंग चड्ढा’च्या काही शोसाठी तुरळक गर्दी दिसून आली. दरम्यान सध्या आमिर खानच्या या सिनेमामुळे वातावरण पेटल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर अनेक ठिकाणी सिनेमावर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं जात आहे.

Web Title: Laal Singh Chaddha Vivek Agnihotri takes dig at Aamir Khans film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.