सेहवाग, युवराज, जहीर खान सगळ्यांनीच धरला ठेका, मित्राच्या लग्नातील डान्सचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 12:19 IST2026-03-12T12:18:59+5:302026-03-12T12:19:51+5:30

बांद्रा येथील घराच्या टेरेसवरच झालं लग्न, बॉलिवूड आणि क्रिकेट विश्व आलं एकत्र

kritika kamra and gaurav kapur wedding sehwag yuvraj singh zaheer khan danced on beat | सेहवाग, युवराज, जहीर खान सगळ्यांनीच धरला ठेका, मित्राच्या लग्नातील डान्सचा व्हिडीओ व्हायरल

सेहवाग, युवराज, जहीर खान सगळ्यांनीच धरला ठेका, मित्राच्या लग्नातील डान्सचा व्हिडीओ व्हायरल

'कितनी मोहोब्बत है' फेम अभिनेत्री कृतिका कामरा लग्नबंधनात अडकली आहे. क्रिकेट प्रेझेंटर, होस्ट गौरव कपूरसोबत तिने लग्नगाठ बांधली. गौरव कृतिकाहून ७ वर्षांनी मोठा आहे तसंच हे त्याचं दुसरं लग्न आहे. गौरव आणि कृतिका वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये होते. काही दिवसांपूर्वी कृतिकाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत नात्याची कबुली दिली. तर काल या कपलने बांद्रा येथील घराच्या टेरेसवरच रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. या इंटिमेट वेडिंग सेरेमनीला बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील अनेकांनी हजेरी लावली. या सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

गौरव-कृतिकाच्या या छोट्या वेडिंग सेरेमनीमध्ये बॉलिवूडमधून फरहान अख्तर, मलायका अरोरा, श्रेया धन्वंतरी, सोहा अली खान, रिया चक्रवर्ती, नेहा धुपिया यांची झलक दिसली. तर क्रिकेट विश्वातील दिग्गज युवराज सिंग, आशिष नेहरा, सेहवाग, झहीर खान आपापल्या कुटुंबासोबत आले होते. या सेरेमनीमधील एक मस्त व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये सेहवाग, युवराज, आशिष नेहरा, फरहान असे सगळेच एकामागोमाग डान्स करत येत आहेत. यानंतर मागून सर्वात शेवटी कृतिका-गौरवची एन्ट्री होत आहे. एका गाण्यावर ठेका धरत सर्वच गौरव आणि कृतिकाच्या आनंदात सहभागी झालेले दिसत आहेत.


व्हिडीओमध्ये नंतर आशिष नेहरा हा युवराज सिंगच्या मुलाला खेळवताना दिसतो. तसंच त्याला डोक्यावर घेऊन नाचतो. या सोहळ्यात क्रिकेट विश्वातील या दिग्गजांनी धमाल केलेली पाहायला मिळत आहे.

एकीकडे अनेक सेलिब्रिटी लग्नासाठी राजस्थानला पसंती देत असताना गौरव आणि कृतिकाने केलेल्या साध्या वेडिंग सेरेमनीचं कौतुक होत आहे. लाल साडीतील कृतिकाच्या लूकवर सर्वांच्याच नजरा खिळल्या तर गौरव रॉयल लूकमध्ये डॅशिंग दिसत होता. चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

Web Title : सहवाग, युवराज, जहीर खान ने दोस्त की शादी में किया डांस; वीडियो वायरल।

Web Summary : अभिनेत्री कृतिका कामरा ने क्रिकेट प्रस्तोता गौरव कपूर से शादी की। एक वीडियो में सहवाग, युवराज और जहीर खान जैसे क्रिकेटर जोड़े के साथ डांस करते हुए दिखाई दे रहे हैं। बॉलीवुड हस्तियों ने भी शादी में भाग लिया।

Web Title : Sehwag, Yuvraj, Zaheer Khan dance at friend's wedding; video viral.

Web Summary : Actress Kritika Kamra married cricket presenter Gaurav Kapur in an intimate ceremony. A video shows cricketers like Sehwag, Yuvraj, and Zaheer Khan dancing with the couple. Bollywood celebrities also attended the simple wedding.