क्रिती सेननच्या 'ब्लू बटरफ्लाय' प्रोडक्शनचं सुशांतसिंगशी आहे कनेक्शन? नेटकऱ्यांनी लावला शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 16:52 IST2023-07-05T16:51:20+5:302023-07-05T16:52:43+5:30
क्रितीने सोशल मीडियावर आपल्या प्रोडक्शन हाऊसचं नाव 'ब्लू बटरफ्लाय' असल्याचं जाहीर केलं.

क्रिती सेननच्या 'ब्लू बटरफ्लाय' प्रोडक्शनचं सुशांतसिंगशी आहे कनेक्शन? नेटकऱ्यांनी लावला शोध
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननने (Kriti Sanon) नुकतेच स्वत:चे प्रोडक्शन हाऊस लॉंच केले आहे. 'ब्लू बटरफ्लाय' (Blue Butterfly Films) असं तिच्या प्रोडक्शन हाऊसचं नाव आहे. तिने याची घोषणा करताच अनेकांनी तिचं कौतुक केलं. अभिनंदनाचा वर्षाव केला. दरम्यान चाहत्यांनी या नावाचं कनेक्शन दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतशी (Sushantsingh Rajput) लावलं आहे. क्रितीने आपल्या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून सुशांतसिंगला ट्रिब्युट दिल्याची चर्चा आहे.
क्रितीने सोशल मीडियावर आपल्या प्रोडक्शन हाऊसचं नाव 'ब्लू बटरफ्लाय' असल्याचं जाहीर केलं. सोबतच लोगो आणि फर्स्ट लुकही रिलीज केला. यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट व्हायरल होऊ लागला. व्हायरल फोटोत एका चाहतीने काही वर्षांपूर्वी सुशांतला प्रश्न विचारला आहे. तू नेहमी ब्लू बटरफ्लाय च्या इमोजीची सतत वापर करताना दिसतो. यामगे काही खास कारण आहे का? असा प्रश्न विचारला आहे. यावर सुशांत उत्तर देतो,'हे एक प्रतीक आहे. सुरुवात, बिना अडचण चालत राहण्याचं, तुमच्या आणि माझ्या सर्वांच्याच आयुष्यातलं हे प्रतीक आहे.' सुशांतने चाहतीला नक्की यामागचं कारण काय आहे ते कमेंटमध्ये समजावून सांगितलंय.
क्रिती सेननने प्रोडक्शन हाऊसचं नाव जाहीर करतानाच नेटकऱ्यांनी ही कमेंट शोधून काढली आहे. आता ती व्हायरल केली जात आहे. पण क्रितीने खरंच ही गोष्ट लक्षात ठेवून सुशांतकडून प्रेरणा घेऊनच ते नाव ठेवलं का याचा अद्याप खुलासा केलेला नाही. रिया चक्रवर्तीसोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी सुशांत क्रितीला डेट करत होता. दोघंही एकमेकांवर प्रचंड प्रेम करत होते. मात्र क्रितीच्या आईला दोघांचं नातं मान्य नव्हतं. म्हणून कालांतराने दोघंही वेगळे झाले. सुशांतच्या निधनानंतर क्रितीने बऱ्याच दिवसांनी एक भावूक पोस्ट शेअर करत मन मोकळं केलं होतं. सुशांतच्या आठवणीत तिने कविताही लिहिल्या.