क्रिती सेननने लॉर्ड्सवर बॉयफ्रेंडसोबत पाहिली मॅच, कबीर बहिया नक्की आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 13:42 IST2025-07-15T13:41:01+5:302025-07-15T13:42:24+5:30
कोणाला डेट करतीये क्रिती सेनन?

क्रिती सेननने लॉर्ड्सवर बॉयफ्रेंडसोबत पाहिली मॅच, कबीर बहिया नक्की आहे तरी कोण?
अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) प्रोफेशनल आणि वैयक्तिक कारणांमुळे नेहमी चर्चेत असते. लवकरच ती धनुषसोबत 'तेरे इश्क मे' सिनेमात दिसणार आहे. शिवाय 'डॉन ३'मध्येही तिची वर्णी लागल्याची चर्चा आहे. क्रितीचं स्वत:चं प्रोडक्शन हाऊसही आहे. 'तीन पत्ती' हा तिने निर्मिती केलेला पहिला सिनेमा. यामध्ये तिने अभिनयही केला होता. सिनेमा, त्यातील गाणी सगळंच गाजलं. दरम्यान क्रिती सध्या बिझनेसमन कबीर बहियाला (Kabir Bahia) डेट करत असल्याच्याही चर्चा आहेत. नुकतेच दोघंही लॉर्ड्सवर टेस्ट क्रिकेट एन्जॉय करताना दिसले.
लॉर्ड्सवर भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. अक्षय कुमराही पत्नीसोबत पोहोचला होता. तर क्रिती सेननही बॉयफ्रेंड कबीर बहियासोबत मॅच बघायला आली होती. कबीरनेच क्रितीसोबतचा स्टेडियमवरील सेल्फी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. क्रितीला जवळ घेऊन मागे स्टेडियमचा नजारा दाखवत त्याने फोटो काढला आहे. दोघंही यामध्ये एकदम स्टायलिश लूकमध्ये दिसत आहेत.
याआधीही क्रिती आणि कबीर अनेकदा सोबत दिसले आहेत. त्यांच्या एकत्रित व्हेकेशनचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. क्रितीने मात्र कबीरसोबतचं नातं कधीच जाहीररित्या मान्य केलं नाही. कबीर बहियाचं एम एस धोनीशीही जवळचं नातं आहे. धोनीची पत्नी साक्षीच्या तो नात्यातला आहे. अनेकदा धोनीच्या कुटुंबासोबतही कबीर आणि क्रितीचे फोटो समोर आले आहेत.
कोण आहे कबीर बहिया?
कबीर बहिया हा एक ब्रिटीश व्यापारी असून त्याने आपले शालेय शिक्षण इंग्लंडमधील बोर्डिंग स्कूलमधून केले आहे. तो वर्ल्डवाइड एव्हिएशन अँड टुरिझम लिमिटेडचे संस्थापक देखील आहे. यूके स्थित ट्रॅव्हल एजन्सी साउथॉल ट्रॅव्हलचे मालक कुलजिंदर बहिया यांचा तो मुलगा आहे.