'कॉफी विथ करण 8'मध्ये सहभागी होणार दिग्गज अभिनेत्री; उलगडणार अनेक रहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 13:40 IST2023-10-13T13:36:13+5:302023-10-13T13:40:24+5:30

'कॉफी विथ करण 8'मध्ये दोन दिग्गज अभिनेत्री दिसणार असल्याची बातमी समोर येत आहे.

Koffee With Karan 8 Zeenat Aman And Neetu Kapoor In Karan Johar Show | 'कॉफी विथ करण 8'मध्ये सहभागी होणार दिग्गज अभिनेत्री; उलगडणार अनेक रहस्य!

'कॉफी विथ करण 8'मध्ये सहभागी होणार दिग्गज अभिनेत्री; उलगडणार अनेक रहस्य!

बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा सर्वात लोकप्रिय 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाचा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाल्याने या पर्वात कोणते सेलिब्रिटी हजेरी लावणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 'कॉफी विथ करण 8'मध्ये नक्की कोणते सेलिब्रिटी हजेरी लावणार याबाबत करण जोहरने भाष्य केलेलं नाही. पण, या शोमध्ये दोन दिग्गज अभिनेत्री दिसणार असल्याची बातमी समोर येत आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान आणि नीतू कपूर करण जोहरच्या शोमध्ये पाहायला मिळणार आहेत.  झीनत अमान आणि नीतू कपूर यांची जोडी 'धरम वीर' आणि 'द ग्रेट गॅम्बलर' सारख्या चित्रपटात दिसली होती. वर्षांनंतर आता दोघेही करण जोहरच्या प्रसिद्ध चॅट शोमध्ये एकत्र दिसणार आहेत. मात्र, या संदर्भात अद्याप अधिकृतपणे काहीही दुजोरा मिळालेला नाही.


येत्या 26 ऑक्टोबरपासून डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या कार्यक्रमाचा प्रीमियर होणार आहे. प्रेक्षक देखील कार्यक्रमाची आतुरतेनं वाट बघत आहेत. कारण, या कार्यक्रमातून प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांबद्दल काही जाणून घ्यायची संधी मिळते करणच्या कार्यक्रमाचं हेच वेगळेपण आहे की बॉलिवूडमध्ये कधीही न घडलेल्या घटना घडतात, त्यामुळे प्रेक्षक त्याची आतुरतेनं वाट बघत आहेत.

Web Title: Koffee With Karan 8 Zeenat Aman And Neetu Kapoor In Karan Johar Show