Koffee with Karan 7: कपूर कुटूंबाची सून झाल्यानंतर इतकं बदललं आलिया भटचं लाइफ, शोमध्ये केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 17:14 IST2022-07-06T17:13:30+5:302022-07-06T17:14:18+5:30
Karan Johar: बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक करण जोहर 'कॉफी विद करण'(Koffee With Karan 7)चं सातवं पर्व घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये रणवीर सिंग (Ranvir Singh) आणि आलिया भट (Alia Bhatt) दिसणार आहेत.

Koffee with Karan 7: कपूर कुटूंबाची सून झाल्यानंतर इतकं बदललं आलिया भटचं लाइफ, शोमध्ये केला खुलासा
बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) 'कॉफी विद करण' (Koffee With Karan 7)चं सातवं पर्व घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये रणवीर सिंग (Ranvir Singh) आणि आलिया भट (Alia Bhatt) दिसणार आहेत. करण जोहरच्या या शोमध्ये रणवीरसोबत सोफ्यावर बसून आलिया भट दिलखुलास गप्पा मारताना दिसणार आहे. याची एक झलक या एपिसोडच्या टीझरमधून पाहायला मिळाली आहे. करण जेव्हा आलिया-रणवीरशी सेलिब्रिटी रिलेशनशिपच्या मुद्द्यावर बोलतो, तेव्हा त्यांच्या जोडीदारांबाबतही बोलताना दिसेल. तिघेही या शोमध्ये बिनधास्त गप्पा मारताना दिसतील. आलियाने कपूर कुटुंबात फिट होण्याच्या अनुभवाबद्दलही सांगितले.
विभक्त कुटुंबातून एकत्र कुटुंबात सामील होण्याच्या प्रवासाबाबत आलिया भटने सांगितले की, आई, बहिण आणि वडीलांसोबत राहून मी लहानाची मोठी झाली आहे. कपूर कुटुंब मात्र खूप मोठे आहे. आम्ही खूप मोठे सेलिब्रेशन्स किंवा गेट-टूगेदर्स करत नव्हतो, पण सर्वजण आपापली कामे चोख बजावतात. कपूर फॅमिलीतील वातावरण मात्र खूपच वेगळे आहे. इथले सर्वजण सर्व गोष्टी एकत्र करतात. एकत्र जेवतात, एकत्र आरती करतात. सर्व काही एकत्रितपणे केलं जातं. कपूर कुटुंबामुळे संस्कृती आणि कौटुंबिक आपुलकीची जाणीव झाल्यामुळे जीवनाला एक नवी दिशा मिळाल्याचेही आलिया म्हणाली.
आलिया आणि रणबीरनं १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. आलिया आणि रणबीरने लग्नाआधी एकमेकांना पाच वर्ष डेट केले. ‘ब्रह्मास्त्र’ च्या सेटवर आलिया आणि रणबीरची पहिल्यांदा भेट झाली.
लवकरच आलिया आणि रणबीरच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. आलिया भटने एक फोटो शेअर करुन चाहत्यांना गूड न्यूज दिली. आलियाचा लवकरच डार्लिंग्स हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.