Koffee With Karan 6: क्रिकेटर लोकेश राहुलचे या अभिनेत्रीवर आहे क्रश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 11:01 IST2019-01-07T10:14:42+5:302019-01-07T11:01:08+5:30
कॉफी विथ करण सिझन 6 या कार्यक्रमाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात भारतीय क्रिकेट टीममधील केएल राहुल अर्थात लोकेश राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी उपस्थिती लावली होती

Koffee With Karan 6: क्रिकेटर लोकेश राहुलचे या अभिनेत्रीवर आहे क्रश
कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या यंदाच्या म्हणजेच सहाव्या सिझनमध्ये आजवर काजोल-अजय देवगण, सैफ अली खान-सारा अली खान, अक्षय कुमार-रणवीर सिंग, दीपिका पादुकोण-अलिया भट, अर्जुन कपूर-जान्हवी कपूर यांसारखे कलाकार झळकले आहेत. या सगळ्याच कलाकारांनी करणसोबत धमाल मस्ती केली आणि आता पहिल्यांदाच करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या या सिझनमध्ये प्रेक्षकांना दोन क्रिकेटर्सना पाहायला मिळाले. त्यांनी या कार्यक्रमादरम्यान करण सोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. तसेच ड्रेसिंग रूममधील अनेक गुपिते देखील उलगडली.
कॉफी विथ करण सिझन 6 या कार्यक्रमाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात भारतीय क्रिकेट टीममधील केएल राहुल अर्थात लोकेश राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी उपस्थिती लावली होती. त्यांनी या कार्यक्रमात त्यांच्या क्रशविषयी देखील करणला सांगितले. लोकेश राहुलने या कार्यक्रमात ड्रेसिंग रूममधील त्याचा सर्वात लज्जास्पद क्षण कोणता होता हे सांगितले, हे ऐकल्यावर करणला देखील त्याचे हसू आवरत नव्हते. त्याने सांगितले की, ड्रेसिंग रूममध्ये अर्धनग्न फिरणाऱ्या क्रिकेटर्सना पाहणे माझ्यासाठी सुरुवातीला धक्कादायक होते. कारण कर्नाटक क्रिकेट बोर्डात ड्रेसिंग रुमच्या बाबतीत काही नियम आहेत. मी दक्षिणेतील कर्नाटकाच्या टीममधून आलेलो आहे, त्यामुळे माझ्यासाठी सुरुवातीला या सगळ्या गोष्टी नवीन होत्या.
कॉफी विथ करण या कार्यक्रमात लोकेश राहुलच्या मित्रांनी त्याच्या खऱ्या आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, के एल वर्गात असताना एकदम शांत असायचा. पण वर्गाच्या बाहेर पडल्यावर त्याची दंगामस्ती सुरू व्हायची. केएल मैदानात असताना देखील एकदम शांत दिसतो. पण मैदानाबाहेर तो खूप वेगळा असतो.
एवढेच नव्हे तर या कार्यक्रमात केएल राहुलने त्याला बॉलिवूडमधील कोणत्या अभिनेत्रीवर क्रश आहे हे कबूल केले. करण जोहरने तुला कोणत्या अभिनेत्रीवर क्रश आहे या केएलला विचारलेल्या प्रश्नावर त्याने काही सेकंद देखील विचार न करता मल्लाईका अरोराचे नाव घेतले.
कॉफी विथ करणचा हा भाग प्रेक्षकांना प्रचंड आवडला असल्याचे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत.