koffee with karan 6 : करीना कपूरने प्रियंका चोप्राला मारला टोमणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 14:25 IST2019-02-18T14:24:53+5:302019-02-18T14:25:51+5:30
प्रियंका चोप्रा व करीना कपूर एकत्र फार कमी वेळा दिसतात. मात्र त्या दोघींना एकत्र एका मंचावर पाहणे कमालीचे ठरणार आहे.

koffee with karan 6 : करीना कपूरने प्रियंका चोप्राला मारला टोमणा
प्रियंका चोप्रा व करीना कपूर एकत्र फार कमी वेळा दिसतात. मात्र त्या दोघींना एकत्र एका मंचावर पाहणे कमालीचे ठरणार आहे.
एकेकाळी या दोघी एकमेकींच्या मैत्रिणी होत्या. मात्र त्या दोघींच्या नात्यात दुरावा आला. आता त्या दोघी चांगल्या मैत्रिणी नाहीत हे नुकतेच कॉफी विद करण शोमध्ये सिद्ध झाले आहे. पण, या दोघींमध्ये अजिबात नाराजी नाही.
कॉफी विद करणचा सहावा सीझन लवकरच बंद होत असून या सीझनच्या शेवटच्या सीझनमध्ये प्रियंका व करीना दिसणार आहे. या एपिसोडचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. या व्हिडिओत करिना व प्रियंकाने आपल्या खासगी आयुष्यातील गोष्टींवर चर्चा करताना दिसत आहेत. एक वेळ येते ज्यात करीना व प्रियंका एकमेकांना सल्ला देताना दिसत आहे. या गप्पांदरम्यान करणने प्रियांकाला विचारले तुला वरुण धवनबद्दल माहिती आहे तर हे पण माहित असणार की तो नताशा दलाल हिला डेट करतोय. यावर प्रियांकाचे उत्तर होते, नाही.
प्रियांकाचे हे उत्तर ऐकून करिना अवाक् होत म्हणाली, वरुण धवन कोणाला डेट करतोय हे तुला माहित नाही असे कसे होऊ शकते? म्हणजे तू आता फक्त हॉलिवूड अभिनेत्यांनाच ओळखतेस, हे विसरु नकोस की तु मुळची भारतीय आहेस.
प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे तर करीना यावेळी करण जोहरच्या प्रोडक्शन निर्मित तख्त व गुड न्यूजमध्ये काम करत आहे.
तर प्रियंकाचा नुकताच हॉलिवूड चित्रपट इजंट इट रोमँटिक प्रदर्शित झाला आहे. याव्यतिरिक्त प्रियंका द स्काई इज पिंकमध्ये देखील दिसणार आहे. या चित्रपटात प्रियंकासोबत फरहान अख्तर दिसणार आहे.