आमिर खानशी घटस्फोट घेऊन किरण राव आनंदी; म्हणाली - "आमच्या दोघांच्याही कुटुंबाचा मला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 15:27 IST2024-07-22T15:20:57+5:302024-07-22T15:27:47+5:30
आमिर खानशी घटस्फोट झाल्यावर किरण राव आहे आयुष्यात आनंदी! काय म्हणाली बघा (aamir khan, kiran rao)

आमिर खानशी घटस्फोट घेऊन किरण राव आनंदी; म्हणाली - "आमच्या दोघांच्याही कुटुंबाचा मला..."
आमिर खान हा बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता. आमिरचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर कायमच सुपरहिट कामगिरी करत असतात. आमिरचे मागील दोन सिनेमे बॉक्स ऑफिसवर चमकदार कामगिरी करु शकले नाहीत. आमिरचं वैयक्तिक आयुष्य सुद्धा चांगलंच चर्चेत असतं. आमिरने काही वर्षांपूर्वी त्याची दुसरी पत्नी किरण रावसोबत घटस्फोट घेतला. आमिरशी घटस्फोट घेतल्यावर किरण राव वैयक्तिक जीवनात आनंदी आहे. काय म्हणाली किरण? जाणून घ्या.
किरण राव आमिरशी घटस्फोट घेतल्यानंतर काय म्हणाली?
घटस्फोट झाल्यानंतरही आमिर खान-किरण राव अनेकदा एकत्र दिसले. यावर किरण रावने फेय डिसूजाला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य केलंय. किरण म्हणते, "मला वाटतं की माणसांमधल्या संबंधांना काही काळानंतर पुन्हा पुन्हा पारखण्याची गरज आहे. आपण जसे मोठे होतो तेव्हा आपण माणूस म्हणून बदलत असतो. आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची गरज भासू लागते. मी जेव्हा घटस्फोट घेतला तेव्हा वाटलं होतं की मला आनंद मिळेल. प्रामाणिकपणे सांगायचं तर मी सध्या खरंच मजेत आहे."
Aamir Khan and Kiran Rao cast their votes #AamirKhan#KiranRaopic.twitter.com/8NSrYFITJs
— $@M (@SAMTHEBESTEST_) May 20, 2024
किरण राव पुढे म्हणाली, "आमिर आयुष्यात येण्याआधी मी अनेक वर्ष सिंगल होती. मला जे स्वातंत्र्य मिळालं त्याचा मी आनंद घेतला. पण आता माझ्यासोबत माझा मुलगा आझाद आहे. त्यामुळे मी आता एकटी नाही. मला वाटतं घटस्फोटानंतर जो एकटेपणा येतो त्याचीच लोकांना जास्त चिंता वाटते. मला आता अजिबात एकटं वाटत नाही. आमच्या दोघांच्याही कुटुंबाचा मला पाठिंबा आहे. त्यामुळे आमचा घटस्फोट खूप सुखद गोष्ट आहे."