'वॉर २'मधल्या बिकिनी सीनवर कियारा अडवाणी म्हणाली, "लेकीच्या जन्मानंतर मी पाहिलं अन्...."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 10:12 IST2025-12-24T10:11:05+5:302025-12-24T10:12:22+5:30
लेकीच्या जन्मानंतर शरिरात बदल झाले, बिकिनी सीन पाहून म्हणाली...

'वॉर २'मधल्या बिकिनी सीनवर कियारा अडवाणी म्हणाली, "लेकीच्या जन्मानंतर मी पाहिलं अन्...."
अभिनेत्री कियारा अडवाणीने काही महिन्यांपूर्वीच गोंडस लेकीला जन्म दिला. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा सध्या पॅरेंटहुड एन्जॉय करत आहेत. त्यांनी लेकीचं नाव 'सयाराह' ठेवलं आहे. लेकीच्या जन्माच्या काही दिवसांआधीच कियाराचा 'वॉर २' रिलीज झाला होता. यामध्ये तिने बिकिनी सीन्सही दिले होते. आई झाल्यानंतर आता ते सीन पाहिल्यावर काय रिअॅक्शन होती यावर तिने नुकतीच प्रतिक्रिया दिली.
'वोग'ला दिलेल्या मुलाखत कियारा अडवाणी म्हणाली, "आजकाल सयाराहकडे पाहून सगळा मानसिक थकवा हलका होतो. तिला झोपेत हसताना पाहण्याचा एक वेगळाच आनंद आहे. तिच्या जन्मानंतर माझं माझ्या शरिराशी असलेलं नातंच बदललं आहे. सुरुवातीला मी वजन कमी करायच्या विचारात असायचे. काही किलो कमी करावं लागेल असं वाटायचं पण आता मला याची जाणीव झाली आहे की मी एका जीवाला जन्म दिला आहे. हा खूपच सुंदर अनुभव आहे ज्यासमोर बाकी सगळंच फिकं आहे. या अनुभवाची इतर कशाशीच तुलना होऊ शकत नाही."
'वॉर २'मधील बिकिनी सीनवर ती म्हणाली, "सिनेमा जेव्हा रिलीज झाला तेव्हा माझं शरीरात खूप बदल झाले होते. डिलीव्हरीनंतर मी विचार केला की मी असा सीन केला आहे आणि भविष्यात मी नक्कीच हा परत करेन. आता मी कशाही शेपमध्ये असले तरी मी माझ्या शरिराचा आदर करते."
कियारा अडवाणीच्या आगामी सिनेमाची घोषणा झाली आहे. ती 'टॉक्झिक' या साउथ सिनेमात दिसणार आहे. साउथ सुपरस्टार यशसोबत ती स्क्रीन शेअर करणार आहे. सिनेमातील कियाराचा फर्स्ट लूकही काही दिवसांपूर्वी आउट झाला. पुढील वर्षी १९ मार्च रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.