KGF Chapter 2 Box Office Collection Day 14: दुसऱ्या आठवड्यातही 'केजीएफ'चाच बोलबोला, बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 12:24 PM2022-04-27T12:24:17+5:302022-04-27T13:59:56+5:30

दुसऱ्या आठवड्यातही साउथचा स्टार यश (Yash)चा चित्रपट केजीएफ २ (KGF Chapter 2) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

KGF Chapter 2 Box Office Collection Day 14: Yash film KGF 2 earns huge profit | KGF Chapter 2 Box Office Collection Day 14: दुसऱ्या आठवड्यातही 'केजीएफ'चाच बोलबोला, बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरूच

KGF Chapter 2 Box Office Collection Day 14: दुसऱ्या आठवड्यातही 'केजीएफ'चाच बोलबोला, बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरूच

googlenewsNext

दुसऱ्या आठवड्यातही साउथचा स्टार यश (Yash)चा चित्रपट केजीएफ २ (KGF Chapter 2) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन बराच काळ लोटला असला तरी कमाई थांबण्याचे नाव घेत नाहीये. आजही चित्रपट पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने चित्रपटगृहात पोहोचत आहेत. यशच्या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातच ३०० कोटींचा आकडा पार केला आहे. केजीएफ २ मोठ्या पडद्यावर एस एस राजामौली यांच्या आरआरआर (RRR) चित्रपटाला टक्कर देत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून हा चित्रपट त्याच्या कलेक्शनमुळे चर्चेत राहिला आहे.

केजीएफच्या शानदार कामगिरीनंतर आता लोकांच्या नजरा १४ व्या दिवशी खिळल्या आहेत. सूत्रानुसार, चित्रपटाने १४व्या दिवशी ७ कोटींचा बिझनेस केला आहे. दुसरीकडे, जगभरातील कलेक्शनबद्दल सांगायचे, तर चित्रपटाने ९५० कोटींचा मोठा आकडा पार केला आहे.  पहिल्या आठवड्यापासून आतापर्यंतच्या एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे तर, याने ३३६.७० कोटींहून अधिक कमाई केली आहे. यासोबतच या चित्रपटाने सर्वाधिक कलेक्शन करणाऱ्या सहाव्या चित्रपटातही आपले नाव कोरले आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागानेही चांगले कलेक्शन केले असले तरी केजीएफ २ने न थांबण्याची शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे केजीएफ २ या चित्रपटात यश व्यतिरिक्त संजय दत्त आणि रवीना टंडन देखील मुख्य भूमिकेत दिसले आहेत.

केजीएफ २ रिलीज झाल्यानंतर शाहिद कपूरचा 'जर्सी' चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला. मात्र, शाहिद कपूरचा रिमेक यशच्या चित्रपटासमोर फार काही कमाल दाखवू शकला नाही. तिसऱ्या आठवड्यात हा चित्रपट अजय देवगण, अमिताभ बच्चन आणि रकुल प्रीत स्टारर 'रनवे ३४' आणि टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया स्टारर 'हिरोपंती 2' सोबत स्पर्धा करताना दिसेल.

Web Title: KGF Chapter 2 Box Office Collection Day 14: Yash film KGF 2 earns huge profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.