'केसरी चॅप्टर २' ओटीटीवर 'या' दिवशी होणार प्रदर्शित, कुठे पाहता येईल चित्रपट? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 09:57 IST2025-06-11T09:53:49+5:302025-06-11T09:57:06+5:30
लवकरच 'केसरी २' हा ओटीटीवर दाखल होणार आहे.

'केसरी चॅप्टर २' ओटीटीवर 'या' दिवशी होणार प्रदर्शित, कुठे पाहता येईल चित्रपट? जाणून घ्या
Kesari Chapter 2 Ott Release Date: नुकताच सुपरस्टार अक्षय कुमारचा या वर्षातील तिसरा चित्रपट 'हाऊसफुल ५' प्रदर्शित झाला आहे. यापूर्वी अक्षयने 'स्काय फोर्स' आणि 'केसरी चॅप्टर २' सारख्या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली. 'स्काय फोर्स' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नव्हता. पण, 'हाऊसफुल ५' आणि 'केसरी २' हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांना थिएटरकडे वळवण्यात यशस्वी ठरले. ज्यांनी अद्याप 'केसरी २' पाहिला नाही आणि ज्यांना परत पाहण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच 'केसरी २' हा ओटीटीवर दाखल होणार आहे.
येत्या १३ जून २०२५ रोजी अक्षय कुमार, आर माधवन आणि अनन्या पांडे यांचा अभिनय असलेला 'केसरी चॅप्टर २' प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर ऑनलाइन स्ट्रीम केला जाईल. चाहते बऱ्याच काळापासून त्याच्या ओटीटी रिलीजची वाट पाहत होते.
'केसरी चॅप्टर २' मध्ये पंजाबमधील अमृतसरमधील जालियनवाला बागेत झालेल्या हत्याकांडाची कहाणी दाखवण्यात आली होती. १३ एप्रिल १९१९ रोजी ब्रिटिश सरकारच्या जनरल रेजिनाल्ड डायरच्या आदेशानुसार सैनिकांनी शीख समुदायातील निःशस्त्र नागरिकांवर गोळीबार केला होता. या चित्रपटात अक्षय कुमारने भारतातील प्रसिद्ध वकील सर सी शंकरन नायर यांची महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सी. शंकरन नायर यांनी जनरल डायरच्या घृणास्पद कृत्याचा पर्दाफाश केला.
केसरी २ चा बॉक्स ऑफिस परफॉर्मन्स
१८ एप्रिल २०२५ रोजी 'केसरी चॅप्टर २' जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचा परफॉर्मन्स उत्कृष्ट होता. 'केसरी चॅप्टर २'ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे ९३ कोटींची कमाई केली. याशिवाय, अक्षय कुमारचा हा चित्रपट जगभरात १४४ कोटींपेक्षा जास्त कमाई करण्यात यशस्वी झाला.