'केसरी २'मध्ये इंग्रजांना शिवी देण्यावर नोंदवला आक्षेप; अक्षय कुमार उठून उभा राहिला अन्....
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 16:20 IST2025-04-03T16:19:22+5:302025-04-03T16:20:16+5:30
'केसरी २'च्या ट्रेलर लाँच वेळेस असं काय घडलं की अक्षय कुमार काहीसा चिडलेला दिसला. जाणून घ्या (akshay kumar)

'केसरी २'मध्ये इंग्रजांना शिवी देण्यावर नोंदवला आक्षेप; अक्षय कुमार उठून उभा राहिला अन्....
'केसरी २'चा (kesari 2) ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. अक्षय कुमार, (akshay kumar) आर.माधवन, अनन्या पांडे या कलाकारांची प्रमुख भूमिका ट्रेलरमध्ये दिसतेय. या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा आज मुंबईत पार पडला. या ट्रेलर लाँचच्या वेळी अक्षय कुमार, माधवन (r madhavan) आणि सिनेमातील अन्य कलाकार उपस्थित होते. 'केसरी २'च्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार एका ब्रिटीश अधिकाऱ्याला F**k You असं बोलताना दिसतो. त्यावर उपस्थित मीडियापैकी एकाने आक्षेप नोंदवला. मग पुढे अक्षय कुमारने काय केलं बघा
'केसरी २'च्या ट्रेलर लाँच सोहळ्यात काय घडलं
'केसरी २'च्या ट्रेलर लाँच सोहळ्यात घडलं असं की, ट्रेलर पाहिल्यानंतर उपस्थित मीडियापैकी एका व्यक्तीने 'इंग्रजांना शिवी देण्याची काय आवश्यकता होती?' असा प्रश्न अक्षयला विचारला. यावर अक्षय त्याच्या खुर्चीवरुन उभा राहिला. तो म्हणाला की, "किती विचित्र गोष्ट आहे की तुम्ही माझी शिवी ऐकली. परंतु इंग्रजांनी आपल्याला गुलाम म्हटलं ते तुम्ही ऐकलं नाही. इंग्रज आपल्याला गुलाम म्हणत आहेत, यापेक्षा मोठी शिवी आपल्यासाठी कोणती असेल? त्यावेळी नायर साहेबांनी त्या ब्रिटीश अधिकाऱ्याला गोळी मारायला पाहिजे होती", असं अक्षय कुमार म्हणाला.
अक्षयच्या उत्तरामुळे सर्वांची बोलती बंद झाली. याशिवाय उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. दरम्यान, 'केसरी-२' या चित्रपटात अक्षय कुमार एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अक्षय कुमारने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला. हा चित्रपट जालियनवाला बाग हत्याकांडाच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये १९१९ च्या हत्याकांडामागील सत्य उलगडण्यासाठी बॅरिस्टर सी. शंकरन नायर यांचा संघर्ष दाखवण्यात येणार आहे. 'केसरी -२' मध्ये अक्षय कुमारसह बॉलिवूड अभिनेता आर. माधवन आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत असणार आहेत.