विकी कौशलच्या वडिलांसाठी कतरिना कैफची खास पोस्ट, काय म्हणाला अभिनेत्री?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 06:50 PM2023-11-24T18:50:42+5:302023-11-24T19:15:44+5:30

अभिनेत्री कतरिनाने सोशल मीडियावर पोस्ट करत सासरे शाम कौशल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Katrina Kaif's special post for Vicky Kaushal's father Sham Kaushal | विकी कौशलच्या वडिलांसाठी कतरिना कैफची खास पोस्ट, काय म्हणाला अभिनेत्री?

विकी कौशलच्या वडिलांसाठी कतरिना कैफची खास पोस्ट, काय म्हणाला अभिनेत्री?

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक जोडपं म्हणजे कतरिना कैफविकी कौशल. कतरिना व विकीकडे एक आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. लग्नानंतरही दोघांमधील प्रेमाचा गोडवा कायम तसाच आहे हे दिसून येतं. सोशल मीडियाद्वारे कतरिना आणि विकी एकमेकांबाबत व्यक्त होताना दिसतात. तर त्यांच्या कुटुंबियांविषयी अनेक पोस्ट शेअर करताना दिसतात. 

कतरिनाने सोशल मीडियावर पोस्ट करत सासरे शाम कौशल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीने इंस्टाग्राम स्टोरीवर कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये सासू, सासरे आणि सनी कौशलही दिसत आहेत. फोटो शेअर करताना कतरिनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हॅपी बर्थडे पापा'. तसेच विकीने वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कतरिनाचे सासरे शाम कौशल हे अनेक दशकांपासून एक अनुभवी स्टंट समन्वयक म्हणून चित्रपटसृष्टीत ओळखले जातात. त्यांनी 80 च्या दशकापासून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली असून, अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, सलमान खान, शाहरुख खान, हृतिक रोशन आणि इतर अनेक स्टार्ससाठी स्टंट सीन्स कोरिओग्राफ केले आहेत.

विकी आणि कतरिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, कतरिना कैफ अलीकडेच सलमान खान स्टारर 'टायगर 3' मध्ये दिसली. यानंतर ती लवकरच विजय सेतुपतीसोबत 'मेरी ख्रिसमस'मध्ये दिसणार आहे. तर विकी कौशल मेघना गुलजारच्या 'सॅम बहादूर' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Katrina Kaif's special post for Vicky Kaushal's father Sham Kaushal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.