कतरिना कैफ-विकी कौशल लवकरच होणार आईबाबा?, प्रेग्नेंसीच्या चर्चेदरम्यान अभिनेत्रीचा बेबी बंपचा फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 13:32 IST2025-09-20T13:31:23+5:302025-09-20T13:32:16+5:30

Katrina Kaif-Vicky Kaushal : गेल्या बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे की कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच आई-बाबा होणार आहेत.

Katrina Kaif-Vicky Kaushal to become parents soon, actress's baby bump photo goes viral amid pregnancy rumours | कतरिना कैफ-विकी कौशल लवकरच होणार आईबाबा?, प्रेग्नेंसीच्या चर्चेदरम्यान अभिनेत्रीचा बेबी बंपचा फोटो व्हायरल

कतरिना कैफ-विकी कौशल लवकरच होणार आईबाबा?, प्रेग्नेंसीच्या चर्चेदरम्यान अभिनेत्रीचा बेबी बंपचा फोटो व्हायरल

गेल्या बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे की कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) लवकरच आई-बाबा होणार आहेत. मात्र, या जोडप्याने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही अन् नाही खंडन केले आहे. नुकतेच आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' प्रीमियरमध्ये विकी कौशल एकटाच आला होता. त्यानंतर, कतरिनाच्या प्रेग्नेंसीच्या चर्चेला आणखी उधाण आले. दरम्यान आता अभिनेत्रीचा बेबी बंप फ्लॉंट करतानाचा फोटो व्हायरल होतो आहे.

कतरिना कैफचा एक फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात ती मरून रंगाच्या गाऊनमध्ये उभी असून बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. मात्र, हा फोटो तिच्या मॅटरनिटी फोटोशूटचा आहे की एखाद्या जाहिरातीचा, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कतरिनाचा बेबी बंपसोबतचा फोटो रेडीटवर व्हायरल होताच, अनेक सोशल मीडिया युजर्सनी आनंद व्यक्त करत अभिनेत्रीचे अभिनंदन केले. एका युजरने लिहिले, "तिच्यासाठी खूप आनंदी आहे... अभिनंदन!" दुसऱ्याने लिहिले, "माझ्या आतला १४ वर्षांचा चाहता ओरडत आहे. अभिनंदन!" तिसऱ्या एका कमेंटमध्ये लिहिले होते, "एका क्षणासाठी मला वाटलं की ही प्रेग्नेंट करीनाची आठवण करून देत आहे. पण, व्वा! अभिनंदन!"

कतरिनाच्या प्रेग्नेंसीच्या अफवा कशा सुरू झाल्या?
कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा ३० जुलैपासून सुरू झाल्या, जेव्हा तिचा आणि विकी कौशलचा एक व्हिडीओ मुंबईच्या फेरी पोर्टवरचा व्हायरल झाला होता. ओव्हरसाईज्ड पांढरा शर्ट आणि बॅगी पॅंट घातलेल्या कतरिनाच्या कॅज्युअल पोशाखामुळे आणि तिच्या सावध चालण्यामुळे ती प्रेग्नेंट असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. ७ ऑगस्ट रोजी या अफवांना जास्त जोर आला, जेव्हा एका व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात आला होता की विकी आणि कतरिना ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करतील. मात्र, ही बातमी केवळ अफवाच ठरली.

विकी-कतरिनाने २०२१ मध्ये केलं लग्न
चाहते विकी आणि कतरिना कधी गोड बातमी देणारेत, त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, अद्याप या जोडप्याने प्रेग्नेंसीबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही. विकी कौशल आणि कतरिना कैफचे लग्न ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये झाले होते.
 

Web Title: Katrina Kaif-Vicky Kaushal to become parents soon, actress's baby bump photo goes viral amid pregnancy rumours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.