कतरिना कैफ खरंच प्रेग्नंट? विकी कौशलने दिलं प्रामाणिक उत्तर; म्हणाला, "गुड न्यूजची वेळ..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 15:32 IST2024-07-15T15:31:25+5:302024-07-15T15:32:58+5:30
विकी कौशल त्याच्या आगामी 'बॅड न्यूज' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनदरम्यान त्याला कतरिना प्रेग्नंट आहे का असा प्रश्न विचारण्यात आला.

कतरिना कैफ खरंच प्रेग्नंट? विकी कौशलने दिलं प्रामाणिक उत्तर; म्हणाला, "गुड न्यूजची वेळ..."
बॉलिवूडमधलं सर्वात चर्चेतलं दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह लवकरच आईबाबा होणार आहेत. सप्टेंबर महिन्यात दीपिका बाळाला जन्म देणार आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर कतरिना कैफच्या (Katrina Kaif) प्रेग्नंसीचीही चर्चा रंगली आहे. कधी लंडनमधून तिचा बेबी बंप दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तर आता नुकतंच अंबानींच्या सोहळ्यातही तिला पाहून ती प्रेग्नंट असल्याची चर्चा झाली. आता नुकतंच अभिनेता विकी कौशलने (Vicky Kaushal) या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.
विकी कौशल त्याच्या आगामी 'बॅड न्यूज' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनदरम्यान त्याला कतरिना प्रेग्नंट आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, "गुड न्यूज जेव्हा येईल तेव्हा ती तुमच्यासोबत शेअर करताना आम्हाला आनंदच होईल. सध्या या केवळ अफवा आहेत त्यावर विश्वास ठेवून का. आता येत असलेला बॅड न्यूड एन्जॉय करा. गुड न्यूजची वेळ येईल तेव्हा आम्ही सांगूच."
कतरिनाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांवर आता पुन्हा पूर्णविराम लागला आहे. दोघांच्या लग्नाला ३ वर्ष पूर्ण झाली आहेत. राजस्थानमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. विकी लवकरच 'बॅड न्यूज' सिनेमात दिसणार आहे. त्याचं 'तौबा तौबा' गाणं सोशल मीडियावर खूपच गाजतंय. तसंच सिनेमातील त्याची आणि तृप्ती डिमरीची केमिस्ट्रीही चाहत्यांच्या पसंतीस पडली आहे.