Katrina Kaif : कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण; फोटो पाहून चाहते संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 05:03 PM2022-12-26T17:03:16+5:302022-12-26T17:04:29+5:30

बॉलिवुड अभिनेत्री कॅटरिना कैफ गरोदर असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. कॅटरिना आणि विकी कौशल यांनी नुकतेच ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले.

katrina-kaif-pregnancy-rumors-again-happening-after-seeing-couple-christmas-photos | Katrina Kaif : कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण; फोटो पाहून चाहते संभ्रमात

Katrina Kaif : कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण; फोटो पाहून चाहते संभ्रमात

googlenewsNext

Katrina Kaif :  बॉलिवुड अभिनेत्री कॅटरिना कैफ गरोदर असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. कॅटरिना आणि विकी कौशल यांनी नुकतेच ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले. मात्र या फोटोत चाहत्यांची नजर फक्त कॅटरिना कडेच गेली. कॅटरिना फोटोत सगळ्यांच्या मागे लपत असल्याचं दिसून येत आहे. 

नुकताच ख्रिसमस सगळीकडेच थाटामाटात साजरा झाला. अख्खे बॉलिवुड ख्रिसमस सेलिब्रेट करण्यात दंग होते. अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. दोघांनी कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा करत असतानाचे फोटो पोस्ट केले आहेत.मात्र यामध्ये कॅटरिना एकाही फोटोत पूर्ण दिसत नाही. कोणाच्या ना कोणाच्या मागे उभी असल्याचे प्रत्येक फोटोत दिसून येते. यावर चाहत्यांनी लगेच तर्कवितर्क लावायला सुरुवात केली. कॅटरिना प्रेग्नंट असल्याच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. यावर अजुन कॅटरिना किंवा विकी दोघांनीही प्रतिक्रिया दिली नाही.

काही दिवसांपूर्वीच हे कपल एका सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी आले असता कॅटरिना बेबी बंप लपवत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

विकी कौशलचा गोविंदा नाम मेरा हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. यात त्याच्यासोबत भूमी पेडणेकर आणि कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय तो सॅम बहादूर, द इम्मोर्टल अश्वत्थामा आणि उधम सिंग या चित्रपटात झळकणार आहे. तर कतरिना कैफ सलमान खानचा बहुप्रतिक्षीत टायगर ३ चित्रपटात दिसणार आहे.

Web Title: katrina-kaif-pregnancy-rumors-again-happening-after-seeing-couple-christmas-photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.