विक्की-कतरिना पूलमध्ये दिसले एकमेकांच्या मिठीत, कपलचे रोमॅंटिक फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 12:02 IST2022-05-07T11:59:59+5:302022-05-07T12:02:12+5:30

Vicky Kaushal Katrina Kaif Romance: कतरिना नेहमीच सोशल मीडियावर पती विक्की कौशलसोबतचे एकापेक्षा एक भारी रोमॅंटिक फोटो शेअर करत असते. आता तिने पुन्हा दोघांचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Katrina Kaif and Vicky Kaushal's romantic and pool photos goes viral | विक्की-कतरिना पूलमध्ये दिसले एकमेकांच्या मिठीत, कपलचे रोमॅंटिक फोटो व्हायरल

विक्की-कतरिना पूलमध्ये दिसले एकमेकांच्या मिठीत, कपलचे रोमॅंटिक फोटो व्हायरल

Vicky Kaushal Katrina Kaif Romance: बॉलिवूड स्टार विकी कौशल आणि कतरिना कैफ सध्या एकमेकांसोबत त्यांची लाइफ एन्जॉय करत आहेत. कतरिना नेहमीच सोशल मीडियावर पती विक्की कौशलसोबतचे एकापेक्षा एक भारी रोमॅंटिक फोटो शेअर करत असते. आता तिने पुन्हा दोघांचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सोशल मीडियावर शेअऱ केलेल्या या फोटोंमध्ये विक्की कौशल आणि कतरिनामधील सिझलिं केमिस्ट्री बघायला मिळत आहे. कतरिनाने फोटो पोस्ट करतानाच हे फोटो व्हायरल झालेत आणि चर्चेचा विषय ठरत आहेत. दोघेही फारच रोमॅंटिक मूडमध्ये दिसत आहेत.

स्वीमिंग पूलमध्ये विक्की शर्टलेस आणि कतरिना बिकीनीमध्ये फारच हॉट दिसत आहेत. कतरिनाने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना कॅप्शनही भारी लिहिलं आहे. तिने लिहिलं की, 'मी आणि माझा'.

कतरिना आणि विक्कीच्या या फोटोंना फॅन्स भरभरून प्रेम देत आहेत. फॅन्स या फोटोंवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांनी डिसेंबरमध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर दोघेही शूटींगमध्ये बिझी आहेत. जसा त्यांना वेळ मिळतो ते एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसतात.
 

Web Title: Katrina Kaif and Vicky Kaushal's romantic and pool photos goes viral