कतरिना कैफ आणि विकी कौशलनं केला इकोनॉमी क्लासमधून प्रवास; चाहते म्हणाले…
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 18:27 IST2022-12-21T18:26:38+5:302022-12-21T18:27:20+5:30
Katrina Kaif-Vicky Kaushal : कतरिना कैफ आणि विकी कौशलचा मुंबई ते दिल्ली विमान प्रवासादरम्यानचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

कतरिना कैफ आणि विकी कौशलनं केला इकोनॉमी क्लासमधून प्रवास; चाहते म्हणाले…
बॉलिवूडचे लोकप्रिय कपल कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) हे गेले काही दिवस सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. ९ डिसेंबर २०२१ या दिवशी या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतरसुद्धा कतरिना आणि विकी चर्चेत येत असतात. नुकताच मुंबई ते दिल्ली विमानप्रवासादरम्यान विकी-कतरिनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ चर्चेत येण्यामागे तसे खास कारणही आहे. इतके मोठे सुपरस्टार असूनही त्यांनी इकॉनॉमी क्लासमधून प्रवास केला आहे.
मुंबई ते दिल्लीच्या फ्लाइटदरम्यान एका प्रवाशाने कतरिना आणि विकीचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. विकी आणि कतरिना हे त्यांच्या बाजूच्या सीटवर बसले आहेत. दोघेही त्यांच्या मोबाइलमध्ये व्यग्र आहेत. यावेळी कतरिना कैफने काळ्या रंगाचा ट्रॅक सूट, मास्क आणि गॉगल्स परिधान केला होता आणि विकी कौशलने लाल रंगाचा ट्रॅकसूट आणि राखाडी रंगाची हुडी घातलेली आहे.
विकी-कतरिनाचा हा व्हिडिओ पाहून चाहते खुश झाले आहेत. त्यांना इकोनॉमी क्लासने प्रवास करताना पाहून कित्येकांनी कमेंट करत त्यांचे कौतुक केले आहे. काही लोकांनी विकी आणि कतरिनाला ‘डाउन टू अर्थ’ म्हटले आहे तर काहींनी व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीवर टीका केली आहे. कोणाच्याही परवानगीशिवाय असा व्हिडिओ काढू नये असे काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
विकी कौशल नुकताच गोविंदा नाम मेरा या चित्रपटात झळकला, तर कतरिना तिच्या विजय सेतुपतीबरोबर आगामी ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.