दीपिकानंतर आता कतरिना कैफही गरोदर? अंबानींच्या पार्टीनंतरचा तो Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 03:04 PM2024-03-04T15:04:03+5:302024-03-04T15:04:42+5:30

कतरिनाने बेबी बंप लपवल्याचं स्पष्ट दिसत आहे.

Katrina Kaif also pregnant ? Ambani's post party video goes viral netizens notices her baby bump | दीपिकानंतर आता कतरिना कैफही गरोदर? अंबानींच्या पार्टीनंतरचा तो Video व्हायरल

दीपिकानंतर आता कतरिना कैफही गरोदर? अंबानींच्या पार्टीनंतरचा तो Video व्हायरल

गुजरातच्या जामनगरमध्ये तीन दिवस अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्याचा जल्लोष पाहायला मिळाला. सोशल मीडियावर केवळ याच सोहळ्याची चर्चा आहे. अमाप खर्च करुन अंबानींनी धाकट्या लेकाच्या प्री वेडिंग सोहळ्याचं आयोजन केलं. अख्खं बॉलिवूड तीन दिवस जामनगरमध्येच तळ ठोकून होतं. बॉलिवूडचं मोस्ट फेवरेट कपल रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणही सोहळ्यात उपस्थित होते. दीपिकाने प्रेग्नंसीची घोषणा केल्यानंतर लगेच ती या सोहळ्यात दिसली त्यामुळे तिनेही भरपूर लाईमलाईट कॅप्चर केलं. आज मात्र दीपिका नाही तर कतरिनाच्या प्रेग्नंसीची चर्चा उठली आहे. एका व्हिडिओमुळे या चर्चेला उधाण आलं आहे.

तीन दिवस चाललेल्या प्री वेडिंग सोहळ्यानंतर सर्वजण पुन्हा मुंबईकडे रवाना झाले. जामनगरमधून निघतानाचे सेलिब्रिटींचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी कतरिना (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) ही गोड जोडी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. कतरिनाने बेबी पिंक रंगाचा अनारकली सूट परिधान केला होता. तिने शाल घेतल्याप्रमाणे ओढणी गुंडाळली होती. तर विकी डेनिम शर्ट आणि जीन्समध्ये कूल लूकमध्ये दिसला. कतरिनाच्या लूझ अनारकली सूटमुळे ती बेबी बंप लपवत असल्याची शंका येत होती. तसंच कॅमेऱ्यासमोर येताना ती पोटावर हात ठेवूनच येत होती. 

विकी कतरिनाचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी लगेच कमेंट्सचा वर्षाव केला. 'ती बेबी बंप लपवत आहे नक्कीच प्रेग्नंट आहे' याच कमेंट्स प्रत्येकाने केल्या आहेत. सर्वांनाच कतरिनाच्या प्रेग्नंसीचीच शंका आली आहे. दीपिका नंतर बॉलिवूडमधली आणखी एक आघाडीची अभिनेत्री गरोदर असेल तर बॉलिवूडमध्ये आनंदाचंच वातावरण पाहायला मिळणार आहे. अद्याप विकी-कतरिनाने या चर्चांवर स्पष्टीकरण दिलेलं नाही. कतरिना कधी गुडन्यूज देते याकडे चाहत्यांचंही लक्ष लागलं आहे.

Web Title: Katrina Kaif also pregnant ? Ambani's post party video goes viral netizens notices her baby bump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.