Katrina Kaif : प्रेग्नंसीच्या चर्चांवर कतरिनाने सोडलं मौन, 'या' दिवशी होणार बाळाचं आगमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 13:01 IST2023-05-05T13:01:13+5:302023-05-05T13:01:44+5:30
अभिनेत्री कतरिना कैफ गरोदर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सतत सुरु असतात.

Katrina Kaif : प्रेग्नंसीच्या चर्चांवर कतरिनाने सोडलं मौन, 'या' दिवशी होणार बाळाचं आगमन
अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) गरोदर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सतत सुरु असतात. कतरिना कोणत्याही इव्हेंटमध्ये सहभागी झाली की ती बेबी बंप लपवत आहे अशा चर्चांना उधाण येतं. तसंच व्हिडिओही व्हायरल होत असतात. नुकतंच ती बाबा सिद्दीकीच्या ईद पार्टीला आली होती. तेव्हा तिने अगदी सैल ड्रेस घातला होता आणि ओढणीने पोट लपवताना दिसली. यावरुन चर्चा परत सुरु झाल्या. तर कतरिनाने आता या चर्चांवर मौन सोडलं आहे.
कतरिना कैफ आणि विकी कौशल गेल्या वर्षी लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर लगेचच कतरिनाच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र या अफवांवर कतरिनाने आता उत्तर दिलं आहे. प्रेग्नंसी प्लॅनिंग कधी करणार यावर कतरिना तिच्या मित्रपरिवारासमोर व्यक्त झाली आहे.ती म्हणाली,"पुढील काही चित्रपटांच्या शूटनंतर बाळाचं प्लॅनिंग करणार आहे."
कतरिना लवकरच फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटाच्या शूटला सुरुवात करणार आहे. यामध्ये पहिल्यांदाच प्रियंका चोप्रा, कतरिना कैफ आणइ आलिया भट तिघी आघाडीच्या अभिनेत्री एकत्र दिसणार आहेत. याशिवाय सलमान खानसोबत 'टायगर 3' मध्येही तिची मुख्य भूमिका आहे. तर साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीसोबतही ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटात झळकणार आहे.