Kartik Aryan : सारा अली खानसोबतच्या अफेयरचं काय झालं?; कार्तिक आर्यननं स्पष्टच सांगून टाकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 02:27 PM2022-09-01T14:27:38+5:302022-09-01T14:34:15+5:30

Kartik Aryan, Sara Ali Khan : ‘लव्ह आज कल 2’चं शूटींग संपलं, तसं कार्तिक व सारा दोघांचं नातं सुद्धा संपलं. दोघांचेही मार्ग वेगळे झालेत. अगदी सोशल मीडियावरही दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं. यादरम्यान सारा व कार्तिक ना कधी डेटिंगवर बोलले, ना ब्रेकअपवर. पण आता...

Kartik Aryan broke his silence on his affair with Sara Ali Khan | Kartik Aryan : सारा अली खानसोबतच्या अफेयरचं काय झालं?; कार्तिक आर्यननं स्पष्टच सांगून टाकलं

Kartik Aryan : सारा अली खानसोबतच्या अफेयरचं काय झालं?; कार्तिक आर्यननं स्पष्टच सांगून टाकलं

googlenewsNext

कार्तिक आर्यन (Kartik Aryan)  व सारा अली खान  (Sara Ali Khan) यांच्या अफेअरची कधीकाळी जोरदार चर्चा होती. खरं तर बॉलिवूड डेब्यूच्या आधीपासूनच साराला कार्तिक आवडायचा. करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये कार्तिकवर क्रश असल्याचं सारानं अगदी खुल्लमखुल्ला सांगितलं होतं. यानंतर आपल्या याच क्रशसोबत ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटात काम करण्याची संधी साराला मिळाली आणि शूटींगदरम्यान दोघांच्या डेटिंगच्या बातम्या येणं सुरू झालं. या काळात दोघंही अनेकदा एकत्र दिसले. पण ही लव्हस्टोरी फार काळ चालली नाही.

‘लव्ह आज कल 2’चं शूटींग संपलं, तसं दोघांचं नातं सुद्धा संपलं. दोघांचेही मार्ग वेगळे झालेत. अगदी सोशल मीडियावरही दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं. यादरम्यान सारा व कार्तिक ना कधी डेटिंगवर बोलले, ना ब्रेकअपवर. पण आता कार्तिकने ब्रेकअपच्या टाइमिंगबद्दल एक खुलासा केला आहे.

  

 गेल्या एक वर्षभरापासून अधिक काळ मी सिंगल आहे, असं तो म्हणाला. एक्स-गर्लफ्रेन्डबद्दल काहीही बोलण्यास त्याने नकार दिला. पण आता मी सिंगल आहे. गेल्या सव्वा वर्षापासून मी एकटा आहे. यापेक्षा अधिक मला काहीही म्हणायचं नाही. कारण हेच सत्य आहे, असं तो एका मुलाखतीत म्हणाला. 

याआधी अशाच मुलाखतीत कार्तिकला त्याच्या लव्हलाईफबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. ‘तुझ्या आणि साराच्या अफेअरच्या बातम्या प्रमोशनल फंडा होता का? असा प्रश्न त्याला केला गेला होता. यावर त्यानं हैराण करणारं उत्तर दिलं होतं. ‘असं अजिबात नाही. काहीही प्रमोशनल नव्हतं. मी तुम्हाला कसं एक्सप्लेन करू? आम्ही पण माणसं आहोत आणि प्रत्येक गोष्ट प्रमोशन नसते. या मुद्यावर मी फक्त एवढंच म्हणेल,’असं कार्तिक म्हणाला होता.

 आईमुळे झालं ब्रेकअप?
सारा व कार्तिकच्या लव्हस्टोरीत साराची मॉम अमृता सिंग ‘विलन’ ठरल्याच्या चर्चाही जोरात होत्या. रिपोर्टनुसार, आपल्या लेकीनं करिअरवर फोकस करावा, तिने कुठल्याही गोष्टीमुळे विचलित होऊ नये, अशी अमृताची इच्छा होती. आईच्या याच इच्छेखातर म्हणा वा दबावापोटी म्हणा साराने रिलेशनशिपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कार्तिकआधी सुशांत सिंग राजपूतसोबतही साराचं नाव जोडलं गेलं होतं.

Web Title: Kartik Aryan broke his silence on his affair with Sara Ali Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.