Karisma Kapoor: वयाच्या ४८ व्या वर्षातही करिश्मा कपूरचा 'बोल्डनेस' कायम, 'ब्लॅक बिकिनी'तील फोटो व्हायरल; पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 17:33 IST2023-01-01T17:31:45+5:302023-01-01T17:33:47+5:30
Karisma Kapoor Latest Photos: करिश्मा कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आता तिनं नववर्षाच्या सुट्टीतील काही खास फोटो शेअर केले आहेत.

Karisma Kapoor: वयाच्या ४८ व्या वर्षातही करिश्मा कपूरचा 'बोल्डनेस' कायम, 'ब्लॅक बिकिनी'तील फोटो व्हायरल; पाहा...
नववर्ष स्वागतासाठी बॉलीवूडकरांची जंगी तयारी दरवर्षी पाहायला मिळते. कुणी परदेशात जाऊन सुट्टीचा एन्जॉय करताना दिसतं तर कुणी भारतातच नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करतं. न्यू इअर वेकेशनसाठी परदेशात गेलेल्या अभिनेत्री करिश्मा कपूरनंही आपले काही खास फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत. ज्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. करिश्मा कपूरनं खूप लवकर बॉलीवूडमध्ये काम करणं थांबवलं. पण तिचा फिटनेस आणि बोल्डनेस आज वयाच्या ४८ व्या वर्षी तसाच आहे. हे दाखवून देणारे हे फोटो आहेत.
करिश्मानं न्यू इअर सेलिब्रेशनसाठी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास सेल्फी शेअर केला आहे. करिश्मा काळ्या रंगाच्या बिकिनीत पाहायला मिळते आहे. "ट्रस्ट द मॅजिक ऑफ न्यू बिगिनिंग. हॅपी न्यू इअर", असं कॅप्शन करिश्मानं आपल्या फोटोला दिलं आहे. करिश्माच्या या बोल्डनेसवर अनेक बॉलीवूडकरांनी आवर्जुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.
डिझाइनर मनिष मल्होत्रा यानं कमेंटमध्ये हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. तर अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा हिनं फायर इमोजी पोस्ट करत करिश्माच्या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. चाहत्यांनीही करिश्माच्या बोल्डनेसवर भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. वयाच्या ४८ वर्षीही करिश्माच्या ग्लॅमरस अदा आणि बोल्डनेसनं चाहते घायाळ झाले आहेत.
१९९१ साली करिश्मानं केलं होतं पदार्पण
करिश्मा कपूरचा जन्म २५ जून १९७५ सालचा आहे. तिनं १९९१ साली बॉलीवूडमध्ये प्रेम कैदी नावाच्या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ९० च्या दशकात करिश्मा कपूर बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये अव्वल स्थानावर होती. २००३ साली करिश्मानं व्यावसायिक संजय कपूर यांच्याशी लग्न केलं. पण २०१६ साली तिनं अधिकृतरित्या संजय कपूर यांच्याशी विभक्त होण्याचाही निर्णय घेतला होता. करिश्मा कपूर चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी ती सोशल मीडियात चांगलीच सक्रिय असते. तसंच चाहत्यांसाठी नवनवे फोटो आणि अपडेट्स देत असते.