करिनाला करायचं होतं 'लव्ह आज कल'मध्ये काम, इम्तियाजने दिला नकार; कारण माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 17:43 IST2024-07-31T17:42:25+5:302024-07-31T17:43:06+5:30

एका मुलाखतीत करिनाने 'लव्ह आज कल' मध्ये न घेतल्याबद्दल एक वादग्रस्त विधान केलं होतं.

Kareena Kapoor wanted to work in Love Aaj Kal Imtiaz refused Do you know the reason | करिनाला करायचं होतं 'लव्ह आज कल'मध्ये काम, इम्तियाजने दिला नकार; कारण माहितीये का?

करिनाला करायचं होतं 'लव्ह आज कल'मध्ये काम, इम्तियाजने दिला नकार; कारण माहितीये का?

इम्तियाज अलीच्या  (Imtiaz Ali) 'जब वी मेट' सिनेमामुळे करिना कपूरला (Kareena Kapoor) यशाच्या शिखरावर पोहोचवलं होतं. आजही तिला गीत या भूमिकेसाठी खूप प्रेम मिळतं. या सिनेमाच्या यशानंतर करिनाला इम्तियाजसोबत पुन्हा काम करायचं होतं. 'लव्ह आज कल' मध्ये तिला ही संधीही मिळाली असती पण इम्तियाजने तिला नकार दिला. काय होतं कारण?

'लव्ह आज कल' सिनेमात सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका होती. सैफ अली खान स्वत: सिनेमाची निर्मिती करत होता. तसंच तेव्हा सैफ करिनाला डेटही करत होता. त्याने इम्तियाजसमोर दीपिकाच्या जागी करिनाला सिनेमात घेण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र इम्तियाजने तो नाकारला. याचं कारण म्हणजे दीपिका पदुकोण सुरुवातीला फक्त मॉडेलिंग करत होती तेव्हाच तिला हा सिनेमा इम्तियाजने ऑफर केला होता. तेव्हा दीपिकाचा अभिनेत्री होण्याचा विचार नसल्याने तिने नकार दिला होता. इम्तियाजने मात्र तू जेव्हा अभिनेत्री होशील तेव्हा तूच हा सिनेमा करशील असं सांगितलं होतं. त्यामुळे दीपिकाने अभिनय क्षेत्रात आल्यावर इम्तियाजने पुन्हा तिच्यासमोर ऑफर ठेवली. त्यावेळी दीपिकाने ऑफर स्वीकारली. याच कारणाने करिनाला सिनेमात घेता आलं नाही. 

एका मुलाखतीत करिनाने 'लव्ह आज कल' मध्ये न घेतल्याबद्दल एक वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानावर इम्तियाज नाराज झाला होता. तो म्हणाला होता की, "जेव्हा करिनाने वक्तव्य केलं ते मला अजिबात आवडलं नाही. मला वाईट वाटलं कारण आम्ही त्यावर चर्चा करुन मतभेद दूर केले होते. मला माहित नव्हतं की ती अजूनही ही गोष्ट मनात धरुन बसली आहे."

Web Title: Kareena Kapoor wanted to work in Love Aaj Kal Imtiaz refused Do you know the reason