मेघना गुलजारच्या सिनेमात करीना कपूरची वर्णी, 'या' सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 12:51 IST2025-04-14T12:50:44+5:302025-04-14T12:51:56+5:30

'दायरा' हा २०१९ मध्ये घडलेल्या एका क्राईम घटनेवर आधारित आहे.

Kareena Kapoor to star in Meghna Gulzar s film daayra with prithviraj sukumaran | मेघना गुलजारच्या सिनेमात करीना कपूरची वर्णी, 'या' सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर करणार

मेघना गुलजारच्या सिनेमात करीना कपूरची वर्णी, 'या' सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर करणार

करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) सिनेसृष्टीत सुपर अॅक्टीव्ह असते. जिकडे तिकडे बेबो ची चर्चा असतेच. करीना गेल्यावर्षी 'सिंघम अगेन' मध्ये दिसली. तर आता ती साऊथ सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित आगामी 'दायरा' सिनेमात करीना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत कोण आहे माहितीये का?

सध्या साऊथ सिनेमा आणि तिथल्या कलाकारांना चांगलाच भाव मिळतोय. तिथले कलाकार हिंदीतही काम करत आहेत. मेघना गुलजारच्या 'दायरा' या आगामी सिनेमात करीना कपूर साऊथ सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारनसोबत (Prithviraj Sukumaran) स्क्रीन शेअर करणार आहे. नुकतंच करीनाने मेघना आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासोबतचा फोटो समोर आला आहे. यामध्ये ती आणि पृथ्वीराज इंटेन्स लूकमध्ये दिसत आहेत. यासोबत ती लिहिते, "मी नेहमी म्हणते की मी दिग्दर्शकाची अभिनेत्री आहे. यावेळी मी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक दिग्दर्शिका मेघना गुलजारसोबत काम करण्यासाठी खूप आतुर आहे. तसंच उत्कृष्ट कलाकार पृथ्वीराज सुकुमारन ज्याचं कामाची मी चाहती आहे त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मला आनंद होत आहे. माझी ड्रीम टीम, दायरा. चला सुरु करुया."




या सिनेमातून करीना आणि पृथ्वीराज पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. 'दायरा'ची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. २०१९ मधील एक क्राइम स्टोरी यामध्ये दाखवण्यात येणार आहे. या सिनेमासाठी सुरुवातीला करीनाच्या अपोझिट आयुषमान खुराणाला कास्ट करण्यात आलं होतं. मात्र नंतर त्याने तारखांच्या कारणांमुळे सिनेमा सोडला. सिनेमात पृथ्वीराज सुकुमारन पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.

Web Title: Kareena Kapoor to star in Meghna Gulzar s film daayra with prithviraj sukumaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.