बेबोच्या धाकट्या लेकाची करामत; तैमुरनंतर आता जेहच्या वर्तणुकीमुळे झाली करीना ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 09:09 IST2024-02-01T09:07:39+5:302024-02-01T09:09:32+5:30
Kareena kapoor: जेहने रागाच्या भरात केलेल्या कृतीमुळे आता करीनाला ट्रोल व्हावं लागतंयय

बेबोच्या धाकट्या लेकाची करामत; तैमुरनंतर आता जेहच्या वर्तणुकीमुळे झाली करीना ट्रोल
बॉलिवूडची बेबी अर्थात अभिनेत्री करीना कपूर (kareena kapoor) तिच्या फिल्मी करिअरसोबतच पर्सनल आयुष्यामुळेही कायम चर्चेत असते. यात खासकरुन तिची दोन्ही मुलं सोशल मीडिया सेन्सेशन आहेत. त्यामुळे लोकप्रिय असलेल्या तिच्या मुलांवर कायमच सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. करीना बऱ्याचदा तिच्या लाडक्या लेकामुळे तैमुरमुळे ट्रोल झाली आहे. तैमुर बऱ्याचदा पापाराझींसोबत वा कॅमेरासोबत उद्धटपणे वागतो किंवा बोलतो. त्यामुळे करीनाला बऱ्याचदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. मात्र, तैमुरनंतर आता करीना धाकट्या लेकामुळे जेहमुळे ट्रोल होऊ लागली आहे.
सध्या सोशल मीडियावर जेहचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये करीना तैमुर आणि जेहसोबत दिसत आहे. करीना नुकतीच तिच्या लेकांसोबत कारमधून उतरली. मात्र, काही कारणास्तव जेह चांगलाच चिडला होता. ज्यामुळे गाडीतून उतरल्यानंतर त्याने रागाने हातातला नॅपकीन जमिनीवर फेकला. इतकंच नाही तर एवढासा जेह रागारागने पुढे चालत गेला. त्यानंतर त्याच्या नॅनीने जमिनीवरचा फेकलेला नॅपकिन उचलला. मात्र, जेहने केलेल्या या कृतीमुळे नेटकऱ्यांनी पुन्हा करीनालाच ट्रोल केलं आहे.
काय म्हणाले नेटकरी?
तैमुरनंतर आता जेह सुद्धा तसंच वागायला लागलाय, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, करीनाने तिच्या मुलांना मॅनर्स शिकवले नाहीत का?, हिचे दोन्ही मुलं असंच रोज वागतात का?, थोडी शिस्त शिकव त्यांना, अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी करीनाला ट्रोल केलं आहे.