अंबानी स्कूलच्या वार्षिक कार्यक्रमात बेबोचा डाएटला रामराम; करण जोहरने उडवली थट्टा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 10:21 IST2025-12-19T09:59:07+5:302025-12-19T10:21:37+5:30
करीना कपूरनं समोशावर मारला ताव! करण जोहर व्हिडीओ तिचा व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

अंबानी स्कूलच्या वार्षिक कार्यक्रमात बेबोचा डाएटला रामराम; करण जोहरने उडवली थट्टा
मुंबईतील प्रसिद्ध धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये काल गुरुवारी, १८ डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. या कार्यक्रमात बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र, या सर्वांमध्ये लक्ष वेधून घेतले ते अभिनेत्री करीना कपूर आणि करण जोहर यांनी. या कार्यक्रमात दोघांनीही डाएटला रामराम ठोकत पदार्थांवर ताव मारल्याचं पाहायला मिळालं.
करण जोहर आणि करीना कपूर या कार्यक्रमात एकत्र बसले होते. यावेळी करीना समोसा खाताना दिसली. यावर लगेचच करणने मोबाईल काढून तिचा व्हिडीओ शूट केला आणि इन्स्टाग्रामवर शेअर करत तिची मस्करी केली. करण व्हिडीओमध्ये म्हणाला, "ज्यांना वाटते की करीना नेहमी डाएटवर असते, त्यांनी हे बघा! बेबो शाळेच्या कार्यक्रमात मोठा समोसा खात आहे. मला तुझा अभिमान आहे, तू माझी 'कार्बी डॉल' आहेस". तर यावर करीना म्हणाली, "नाही, मी अजिबात डाएटवर नाहीये!".
करीनानेही करण जोहरचा एक फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला, ज्यात तो एक 'रॅप' खाताना दिसत आहे. त्यासोबत तिनं लिहलं, "करणही खातोय!". या दोन्ही स्टार्समधील बॉन्डिंग चाहत्यांना प्रचंड आवडलं आहे.

धीरूभाई अंबानी स्कूलचा हा कार्यक्रम म्हणजे जणू बॉलीवूडचा एखादा मोठा पुरस्कार सोहळाच वाटत होता. यावेळी शाहरुख खान आणि गौरी खान हे आपला मुलगा अबरामसाठी उपस्थित होते. तर अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनीही आराध्यासाठी कार्यक्रमात एकत्र हजेरी लावली. करीना कपूरची मुले तैमूर, जेह तर करण जोहरची मुले यश, रूही याच शाळेत शिकतात.