धर्मेंद आणि शबाना आझमी यांच्या लिपलॉक सीनवर करण जोहरचं भाष्य, म्हणाला, "मी त्यांना..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 14:07 IST2023-08-01T14:06:17+5:302023-08-01T14:07:02+5:30
'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मधील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा किसींन सीन व्हायरल, करण जोहर म्हणाला...

धर्मेंद आणि शबाना आझमी यांच्या लिपलॉक सीनवर करण जोहरचं भाष्य, म्हणाला, "मी त्यांना..."
सध्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या बॉलिवूड चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. करण जोहर दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. रणवीर सिंह आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटात धर्मेंद आणि शबाना आझमी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटातील धर्मेंद आणि शबाना यांचा किसींग सीन प्रचंड व्हायरल झाला आहे. चित्रपटातील या सीनची प्रचंड चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. या सीनवर आता करण जोहरने प्रतिक्रिया दिली आहे.
करण जोहरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटातील या व्हायरल सीनबाबत भाष्य केलं. तो म्हणाला, "हा सीन करण्यासाठी मला त्यांना आग्रह करावा लागला नाही. दोन दिग्गज कलाकारांनी अतिशय मोहक पद्धतीने एकही प्रश्न न विचारता हा सीन शूट केला. अभी ना जाओ छोड कर हे माझं फेव्हरेट गाणं आहे. आणि हे त्यांचं गाणं असायला हवं होतं. कारण, मॉलच्या रस्त्यावर चालत असताना ती हेच म्हणते. हे त्यांचंही फेव्हरेट गाणं आहे. आणि रॉकी आणि रानीच्या लव्हस्टोरीचंही हेच कनेक्शन आहे."
"अमृता तू खास आहेस", रणवीर सिंहच्या इन्स्टा स्टोरीने वेधलं लक्ष, अमृता खानविलकरही भारावली
शिव ठाकरेला डेट करण्याच्या चर्चांवर बॉलिवूड अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही एकमेकांना..."
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्टसह धर्मेंद्र, शबाना आझमी, जया बच्चन आणि क्षिती जोग यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ११ कोटींची कमाई केली होती. चार दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५३ कोटींचा गल्ला जमवला आहे.